शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ अंकुश देवसरकर यांची तर सचिव पदी अँड शिवाजीराव वानखेडे यांनी निवड.

youtube

शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ अंकुश देवसरकर यांची तर सचिव पदी अँड शिवाजीराव वानखेडे यांनी निवड.

उमरखेड: स्थानिक जिजाऊ भवन येथे शिवश्री उत्तमराव पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये शिवजयंती महोत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ अंकुश देवसरकर तर सचिवपदी अँड शिवाजीराव वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ह्या प्रसंगी विचार पिठावर प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या सहसचिव सरोज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तेला, न.पा. माजी उपाध्यक्ष अरविंद भोयर, माजी सभापती संदीप ठाकरे, माजी सभापती प्रकाश दुधेवार, माजी अध्यक्ष बाळासाहेब ओझलवार, डॉ.अजय नरवाडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी वानखेडे होते. शिवजयंती महोत्सव 2025 मोठ्या प्रमाणात व सर्व समावेशक साजरा करण्याकरिता शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व तमाम शिवप्रेमींना घेऊन नियोजनबद्ध व भव्यदिव्य करण्यात येणार असल्याचे मत नवनियुक्त अध्यक्ष डॉ अंकुश देवसरकर यांनी सांगितले. या प्रसंगी संदिप ठाकरे, सुरेश कदम, सुधाकर वानखेडे यांनी शिवजयंती महोत्सव यशस्वी करण्याच्या दृष्टीने विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड शिवाजीराव वानखेडे यांनी तर सूत्रसंचालन सचिव रवींद्र चव्हाण व आभार उपाध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी मानले.
या प्रसंगी बालाजी वानखेडे, वसंतराव देशमुख, बळवंतराव चव्हाण, वीरेंद्र खंदारे, विश्वंभर वानखेडे, प्रकाश शिंदे, प्रा.गणेश जाधव, दत्तात्रय काळे, विलास चव्हाण सर, विजय माने सर, सतीश कदम, आत्माराम सुरोशे, बाळासाहेब शेवाळकर, चांदराव सुरोशे, गोपाल रुडे, नितीन कलाने, नीलकंठ चव्हाण, बंडू भुते, नितीन शिंदे, जि.बी.जाधव सर , प्रा. साई काळे सर यांचे सह शहरातील अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ अंकुश देवसरकर यांची तर सचिव पदी अँड शिवाजीराव वानखेडे यांनी निवड.

  1. gab You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!