शिक्षण संस्थेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाक मुलीचा बळी संस्था चालक ,आरटीओ सह पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा देवसरकर कुटुंबीयांनी केला पत्रकार परिषदेतून रोष व्यक्त उमरखेड :

youtube

शिक्षण संस्थेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाक मुलीचा बळी

संस्था चालक ,आरटीओ सह पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

देवसरकर कुटुंबीयांनी केला पत्रकार परिषदेतून रोष व्यक्त

उमरखेड :

येथील स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश माध्यम इयत्ता नववी त शिकत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीचा शाळेच्या बसमध्ये शाळेकडे येत असताना पळशी फाट्याजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात वेदना देणारी असून या घटनेतील दोषी संस्थेचे अध्यक्ष ,आरटीओसह पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असा रोष आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कुटुंबीयांनी आपल्या निवासस्थानी विठ्ठल बाग येथे दि 26 रोजी व्यक्त केला .
यावेळी पाटील यांनी आपल्या कुटुंबासह कु महिमा यांच्या घरी भेट दिल्यानंतर आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करून प्रकाश पाटील देवसरकर यांच्या पत्नी सौ निकिता प्रकाश देवसरकर सून सौ मयुरी शाहुराज देवसरकर व सौ प्रिया युवराज देवसरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली .
याप्रसंगी प्रकाश पाटील यांनी दुःख व्यक्त करीत असताना पाटील सांगितले येथील स्टुडन्ट वेल्फेअर इंग्रजी शाळेतील एकंदरीत सर्व वाहने भंगार व्यवस्थेत आहेत येथील स्कूल बस मध्ये एकही वाहन चालकांकडे परवाना नसून वाहनांचा सुद्धा परवाना नाही तसेच बसमध्ये वाहन चालका व्यतिरिक्त आणखीन एक केअर टेकर असायला हवे होते परंतु ते अद्यापही नसल्याचे समजले असून अशा वाहनांना परवाना देणारे आरटीओ यांनी या शाळेतील वाहनांची तपासणी केला होती नाही का ? सदर संस्थेचे अध्यक्ष ,मुख्याध्यापक निष्क्रिय वाहन चालक तथा पोलीस अधिकारी व आरटीओ यांच्यावर निष्पाक मुलीचा बळी घेतल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार परिषदेतून आवाहन केले
यावेळी सौ . मयुरी शाहुराज देवसरकर कार्यकारी संचालक जिजाऊ अर्बन बँक यांनीही हळहळ व्यक्त करीत सदर घटनेमुळे माझे अश्रू अनावरण झाले नाहीत शाळेतील शिक्षण समितीच्या दुर्लक्षितपणामुळे एका निष्पाक आई-वडिलांनी आपली मूल गमावली असल्याचे सांगितले व
स्कूल बसचे नियम क्राईट एरिया काय असायला पाहिजे याबद्दलही माहिती सांगितली तसेच मागील सहा महिन्यापूर्वी याच चालकांनी शाळेची बस एका शेतामध्ये टाकल्याने अपघात टळले होते असेही सांगितले
तसेच सौ प्रिया युवराज देवसरकर ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा यांनीही सदर घटनेचे दुःख व्यक्त करीत आई-वडिलांनी आपली मुल पूर्ण विश्वासाने शिक्षण संस्थेच्या भरोश्यावर घरापासून पंधरा ते वीस किलोमीटर दूर पाठवतात व काही क्षणातच त्या एकुलत्या एकी लेकीचं अपघाती निधनाची वार्ता आई-वडिलांपर्यंत पोहोचतात अशा निष्काळजी संस्था चालक व त्यांच्या संपूर्ण स्टॉप वर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे सांगितले .
यानंतर पाटील यांच्या पत्नी सौ निकिता देवसरकर यांनी बोलताना सांगितले ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कु महिमा शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करत होती व आईला तिने सांगितले आई मी आज शाळेत जाणार नाही या नादुरुस्त बस मध्ये दररोज खूप त्रास होतो आणि शेवटी अशी दुःखद घटना घडली असे म्हणून तिच्या आईचे अश्रू थांबत नव्हते पुढे बोलताना फेब्रुवारी महिन्यातील 12 फेब्रुवारी रोजी महिमाचा वाढदिवस साजरा होणार होता मागील पंधरा वर्षापासून वाढदिवसानिमित्त पूर्ण गावाला गाव जेवण देत असे ही कळाले असल्याचे सांगण्यात आले
याप्रसंगी देवसरकर कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त करत कु महिमा या निष्पाक बालिकेचा बळी घेणारा कोण ?
त्या स्कूलबस ची पाहणी करून परवाना देणारा तो आरटीओ की त्या वाहनावर विनापरवाना परवानगी देणारा पोलीस अधिकारी की विना लायसन , बॅच बिल्ला नसतानाही गाडीवर पाठवणारा मुख्याध्यापक की संस्था चालक या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी आयोजित पत्रकार परिषदेतून सांगितले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!