मृतक कुमारी महिमा सरकाटे ला न्याय द्या ( स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासना विरोधात पालकांचे ठिय्या आंदोलन ) उमरखेड :-
मृतक कुमारी महिमा सरकाटे ला न्याय द्या
( स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासना विरोधात पालकांचे ठिय्या आंदोलन )
उमरखेड :-
स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेली कु. महिमा अप्पाराव सरकाटे हिचा दि 25 रोजी झालेल्या स्कूलबस च्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषी संस्थाचालक व सर्व संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा व शाळेची मान्यता रद्द करा या मागणीसाठी दिवटपिंपरी , पोफाळी , पळशी , कळमुला , जनुना या पाच गावातील शाळेतील पालक वर्गांनी शाळेच्या प्रांगणात ठिया आंदोलन केले यावेळी पोफाळी पोस्टे चे थानेदार पंकज दाभाडे यांच्या मध्यस्थीने दि. 30 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आरोपीला अटक करण्यात येईल या आश्वासनानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले परंतु उद्या अकरा वाजेपर्यंत संस्था अध्यक्षास अटक न झाल्यास पळशी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी पालकांनी व्यक्त केला .
दि . 25 जानेवारी रोजी उमरखेड पुसद रोडवर स्कूल बस चा भीषण अपघात झाला या अपघातात दिवटपिंपरी येथून स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत स्कूल बस मध्ये जाताना कु महिमा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला .सदर घटनेनंतर शाळेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची लक्तरे समोर आली असून यामुळेच महिमाचा मृत्यू झाला असून यासाठी स्टुडन्ट इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थाचालक व शाळेचे प्रशासन जबाबदार असून दोषी संस्थाचालक व सर्व संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संस्थाध्यक्ष दर्शन अग्रवाल व सर्व संचालकांना अटक करा व स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूल शाळेची मान्यता रद्द करून मृतक कु महिमाला न्याय द्या या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता पासून पाच गावातील पालकांनी ठिय्या आंदोलन केले .
सकाळी 11 वाजता सुरू केलेले ठिय्या आंदोलन दुपारी अडीच वाजेपर्यंत चालले पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे तसेच उमरखेड पोस्टचे सपोनी निलेश सरदार यांनी पालकांसोबत संवाद साधला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख ॲड संजय जाधव , रवीकांत रुडे ,कैलास कदम अजय पाईकराव ,संदीप ठाकरे , बसवेश्वर क्षीरसागर यांनी ठिय्या आंदोलनाला समर्थन देत पालकांच्या बाजूने पोलीस प्रशासनासमोर बाजू मांडली .सदर शाळेच्या संस्थाध्यक्ष यांना त्वरित अटक करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले .त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले परंतु दि 30 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आरोपीस अटक न झाल्यास पळशी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी पालकांनी व्यक्त केला .
यावेळी शाळेत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता .
चौकट
पालकांमध्ये तीव्र संताप
स्कूलबस चा अपघात झाल्यानंतर स्कूल बस अपघात चौकशी समिती यांनी शाळेत चौकशी केल्यानंतर शाळा प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला व कागदपत्रात बरीच तफावत आढळून आली .त्यामुळे आज पालकांमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप होता .
( सोबत आंदोलकांशी चर्चा करताना ठाणेदार दाभाडे )