मुलींनो सक्षम व्हा. घाबरू नका ,आपल्या अडचणी  शिक्षकांसमोर निर्भीडपणे मांडा – एपीआय सारीका राऊत उमरखेड :-

youtube

 

मुलींनो सक्षम व्हा. घाबरू नका ,आपल्या अडचणी  शिक्षकांसमोर निर्भीडपणे मांडा
– एपीआय सारीका राऊत

उमरखेड :-
विद्यार्थीनींनी आपल्याला उद्भवणारी समस्या विनाविलंब शिक्षकांसमोर मांडली तरच अपप्रवृत्तीला आळा बसेल , असे प्रतिपादन उमरखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सारीका राऊत यांनी केले आहे .
त्यांनी महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत ब्राम्हणगाव येथील श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात दि 1 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू सादूडे हे होते .
यावेळी मुलींना मार्गदर्शन करतांना एपीआय राऊत यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी फौजदारी कायद्यांची माहिती दिली . पूर्वीच्या भारतिय दंड विधान ऐवजी आता आपल्या सरकारने भारतिय न्याय संहिता तथा भारतिय नागरिक सुरक्षा संहिता असा बदल केल्याचे सांगून 18 वर्षाच्या आतील मुला मुलींचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 मध्ये अंमलात आल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थीनींना त्रास देण्याच्या शाळा परिसराभोवताल जोरात दुचाकी चालविणे , मुलींना इशारे करणे , छेड काढणे शाळेभोवती घिरट्या घालणाऱ्या अशा टपोरी मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी मुलींनी आपली समस्या मनावर कुठलेही दडपण न बाळगता तत्काळ आपले शिक्षक मुख्याध्यापक यांच्या समोर तसेच डायल 112 क्रमांकावर तशी माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेऊन टपोरींचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पोलीस मदत मिळेल याकरिता मुलींनी बिनदिक्कतपणे मांडल्यास अशा प्रवृत्तींना आळा बसेल असे सांगून शिक्षण हे वाघीनीचे दुध असून आपल्या आईवडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी तनमनाने अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी दिला . यावेळी प्राचार्य विष्णू सादूडे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलमधील चांगल्या गोष्टी ऐवजी वाईट गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात याबाबत चिंता व्यक्त करून पालकांना मुलींच्या सुरक्षेची काळजी असते वाईट घटना टाळण्यासाठी मोबाईल व्हॉटस् ॲप फेसबुक चा वापर टाळावा व आपली शैक्षणिक प्रगती साधावी याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी प्रमुख अतिथी समन्वयक भुवनेश्वर गावंडे , देवराव चिभडे , नंदकिशोर पिंपळकर अनिल पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघाडे , विजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग माने यांनी तर आभार महेश पानपट्टे यांनी मानले .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “मुलींनो सक्षम व्हा. घाबरू नका ,आपल्या अडचणी  शिक्षकांसमोर निर्भीडपणे मांडा – एपीआय सारीका राऊत उमरखेड :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!