हर घर तिरंगा घरघर तिरंगा रॅली संपन्न उमरखेड

हर घर तिरंगा घरघर तिरंगा रॅली संपन्न
उमरखेड :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफाळी तालुका उमरखेड येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलींनी रांगोळी स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा या स्पर्धेत भाग घेऊन हर घर तिरंगा घरघर तिरंगा या अभियानात पोफळी गावातून लेझीम, डफडी च्या वाद्यामध्ये विद्यार्थी, आणि विद्यार्थीनीनी पोफाळी च्या चौका चौकात लेझीमचे नेत्रदिपक प्रात्यक्षिक दाखविले यावेळी या प्रात्यक्षिकातून विविध सामाजिक प्रबोधन करण्यात आले, ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदीर, अहिल्याबाई होळकर चौक, संत गजानन महाराज मंदीर, बौद्ध विहार इत्यादी ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिके दाखवले. ढोल ताशा व विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेतल्यामुळे पोफाळी गाव घोषणांनी दुमदुमुन गेले होते . विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गावातील गावकरी मंडळींनी तोबा गर्दी केली होती. यावेळी श्री शिवाजी विद्यालय पोफाळी येथील मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका तसेच गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Istanbul food guide Everything ran exactly as planned. https://www.toofoodies.com/?p=26401
Istanbul Archaeology Museums tour Perfect for a half-day or full-day sightseeing. https://skillifier.com/?p=54427