“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर “समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” — अनिल पाटील

“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर
“समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” — अनिल पाटील
व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन
राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव (प्रतिनिधी): पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या जाणीवा जागृत करण्याचे आणि पत्रकारांना संघटित करण्याचे विलक्षण कार्य “व्हॉईस ऑफ मीडिया”ने उभारले आहे. स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत पत्रकारितेला नवे आयाम देत, ही चळवळ आज भारतीय पत्रकारितेचा अभिमान ठरली आहे. देशभरातील पत्रकारांना एकत्र बांधून त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचे काम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सातत्याने करत आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. तर, “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाशी जोडणारे सशक्त माध्यम आहे. उत्कृष्ट पत्रकार होण्यासाठी शैली, वाक्यरचना आणि ‘बिटवीन द लाईन्स’ लिहिण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री आ. अनिल पाटील यांनी केले.
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘केडर कॅम्प’चे उद्घाटन रविकांत तुपकर आणि अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी हे दोन्ही मान्यवर बोलत होते. यावेळी *व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित देशमुख, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, राज्य समन्वयक कुमार कडलक, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गोरक्षनाथ मदने, महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, ग्रामीण महिला प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संगम कोटलवार, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख, सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर, नाशिक विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले* यासह राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारिता कशी करावी आणि करताना स्वतःला कसे सांभाळावे याविषयी बोलताना पाटील म्हणाले की, प्रत्येक पत्रकार वाईट असतो असे नाही आणि प्रत्येक पत्रकार उत्कृष्ट असतो असेही म्हणता येत नाही. मात्र, जो उत्कृष्ट पत्रकार घडवायचा प्रयत्न करतो, तोच समाजात खरी छाप सोडतो.
पत्रकारितेमुळेच मला मोठ्या मीडियासमोर बोलण्याचे धाडस आले, असे सांगताना पाटील म्हणाले की, “माझ्या मंत्रीपदाच्या काळात विधानसभेत, मंत्रिमंडळात तसेच इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियासमोर बोलताना मिळालेले धाडस हे पत्रकार बांधवांच्या अनुभवातूनच घडले. ‘व्हॉईस ऑफ मिडिया’सह अनेक पत्रकार बांधवांकडून मला मिळालेले मार्गदर्शन हेच माझे प्रशिक्षण ठरले.”
पत्रकारितेमध्ये समतोल साधणे, समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचवणे आणि जनतेच्या भावना मांडणे हेच पत्रकाराचे खरं काम असल्याचे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
राज्यातून आलेल्या पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा केवळ प्रशिक्षण शिबिर न राहता एकात्मता, संवेदना आणि संघटनशक्तीचा उत्सव ठरला. मंचावरच्या प्रत्येक क्षणातून पत्रकारितेचे नवे भान, नवी ऊर्जा आणि नवे स्वप्न उमलताना दिसून आले. सर्व सहभागी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा ऐतिहासिक सोहळा पत्रकार चळवळीच्या वाटचालीत नवा मैलाचा दगड ठरला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, अमळनेरचे तालुका अध्यक्ष उमेश काटे आणि त्यांच्या सहकारी टीमच्या पुढाकारातून येथे उत्तम नियोजन केले आहे.
चौकट
*राज्यस्तरीय ट्रेडर कॅम्पमध्ये पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉ. युवराज परदेशी यांनी ‘डिजिटल मीडिया व ‘एआय’चा वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पत्रकारिता व समाजमन या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी विविध सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी देशात व राज्यात संघटन बांधणीसाठी काय चांगले काम झाले अन भविष्यात काय करावे लागेल यासाठी सर्व विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांचे चर्चासत्र घडवून आणले. उदघाटन सत्रात संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी प्रास्ताविक केले तर तालुकाध्यक्ष उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.*
फोटो ओळ:
अमळनेर – व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन करतांना मान्यवर. केडर कॅम्पमध्ये राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.