ओ भाऊ पेट्रोल भरू नका मी तुमचा सत्कार करतो — : शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासन हादरले

ओ भाऊ पेट्रोल भरू नका मी तुमचा सत्कार करतो — : शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासन हादरले
उमरखेड (प्रतिनिधी):
अडीच महिन्यांपूर्वी लीज संपलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवनिर्माणाधीन अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला अडथळा ठरणारा पेट्रोल पंप हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज थरारक वळण मिळाले. दुपारी सुमारास दोन आंदोलनकर्त्यांनी थेट “शोले स्टाईल” वीरूगिरी करत व्यापारी संकुलावर चढून आत्मदहनाची धमकी दिली.
गजानन देशमुख आणि गोपाल झाडे या दोन आंदोलनकर्त्यांनी हातात पेट्रोलची बाटली आणि गळ्यात फासाची दोरी लटकवून “शोले” चित्रपटातील वीरू स्टाईलमध्ये आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे चौकात शेकडो नागरिकांची गर्दी जमली, वाहतूक ठप्प झाली आणि काही काळ शहरातील वातावरण तणावग्रस्त बनले.
—
प्रशासन बेदखल – आंदोलनकर्त्यांचा संताप
घटनेच्या वेळी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. “आम्ही १७ दिवसांपासून उपोषण करतोय, आणि प्रशासन झोपेत आहे!” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान, उपोषण मंडपातून लाऊडस्पीकरवरून “ओ दादा, ओ मामा, ओ काका — येथे पेट्रोल भरू नका!” अशी घोषणा देत पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांना पेट्रोल न भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
—
१७ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीने गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. अभय पवार, गजानन देशमुख, प्रकाश आर्य, रवींद्र कलाने, गुलाब सूर्यवंशी हे कार्यकर्ते पेट्रोल पंप हटविण्याची मागणी करत बसले आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे आज आंदोलन अधिक आक्रमक झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत मागणी मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला.
—
पेट्रोल पंप अतिक्रमणात असल्याचा संघर्ष समितीचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत पेट्रोलियमचा पुरुषोत्तम अँड कंपनी हा पंप असून, तो सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अतिक्रमण क्षेत्रात येतो, असा संघर्ष समितीचा आरोप आहे.
पंपाची लीज अडीच महिन्यांपूर्वी संपलेली असूनही त्याचे संचालन सुरू आहे. त्यामुळे “शासनाचे अधिकारी आणि पंपचालक यांचे मिलीभगत” असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
—
उपोषण मंडप हलविण्याची नोटीस – आंदोलक संतप्त
पेट्रोल पंपासमोर उभारलेला उपोषण मंडप महामार्गाच्या कडेवर असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे, या कारणावरून उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ ऑक्टोबर रोजी मंडप हलविण्याची नोटीस दिली.
यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि आज त्यांनी “शोले स्टाईल” आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
—
प्रशासनाची उशिरा धावपळ
घटनेदरम्यान चौकात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला. संपूर्ण परिसरात ट्रॅफिक जाम झाला होता. नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.
शेवटी सुमारे ४.१५ वाजता उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रमोद दुधे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संघर्ष समितीशी चर्चा केली. मुळे यांनी स्पष्ट केले की,
> “भारत पेट्रोलियमला लीज दिलेली आहे. सन २०१० मध्ये लीज रद्द केली होती, मात्र हायकोर्टाने ती पुन्हा दिली. सध्या लीज न देण्याबाबत नकारात्मक अहवाल पाठवला आहे. वैयक्तिक लाभार्थ्याला लीज दिलेली नाही.”
या वक्तव्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले की, “पेट्रोल पंपाची टाकी २४ मीटर अतिक्रमणात येते, तरी कार्यवाही का होत नाही?” असा प्रश्न विचारला.
—
शेवटी पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रशासन कोणताही ठोस निर्णय घेऊ न शकल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. अखेर सायंकाळी ५.१५ वाजता पोलीस कर्मचाऱ्यांनी इमारतीवर दुसऱ्या मार्गाने चढून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि उपोषण मंडपावर आणले.
—
शहरात चर्चा – “पेट्रोल पंप हटवणार की आणखी झाकणार?”
या घटनेमुळे उमरखेड शहरात एकच चर्चा रंगली आहे —
> “अडीच महिन्यांपासून लीज संपलेली असताना प्रशासन एवढं शांत का? पुतळ्याचं सौंदर्यीकरण थांबवणार की अडथळा दूर करणार?”
संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
Turkey nightlife tours Highly recommend these Turkey tours! Professional guides, comfortable transportation, and amazing destinations. https://bushmansafaris.com/?p=18028
Turkey photography tours Fantastic experience! The Turkey vacation packages were worth every penny. Ephesus was stunning and the Aegean coast was paradise. https://cottoecrudo.it/?p=31465
Aegean tours Turkey Maria G. – İspanya https://radheradheonline.in/?p=7208