छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्या सभोवतालची वादग्रस्त जागा मोकळी करण्यासाठी आमदार वानखेडे चा पुढाकार उमरखेड –
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्या सभोवतालची वादग्रस्त जागा मोकळी करण्यासाठी आमदार वानखेडे चा पुढाकार
उमरखेड –
मागील अनेक दिवसां पासुन शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याच्या पश्चिम भाग सभोतालची वादग्रस्त जागा मोकळी करण्यासाठी आंदोलने सुरु होते तेंव्हा ९ नोव्हेंबर रविवार रोजी आमदार किसनराव वानखेडे यांनी स्वत : त्या ठिकाणी स्थळाला भेट देऊन तत्काळ पणे अतिक्रमणीत ठरणारी जागा मोकळी करा असे पेट्रोल पंपाचे संचालक दिलीप सारडा यांना सांगितले व त्या संदर्भात पुढाकार घेतला यावेळी शहरातील अनेक नागरिक जमले होते या वेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते वादग्रस्त कळीचा मुद्या ठरत असलेली जागा मोकळी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा सभोवताल चा परिसर मोकळा होऊन शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सहजपणे मार्ग सुलभ होणार आहे या सर्व पुढाकाराने जागा मोकळी व्हावी या वाढत चाललेला वादाला विराम मिळणार आहे




I got good info from your blog