बिटरगाव पोलीस स्टेशनची कामगिरी.अवैध दारु साठा जप्त उमरखेड प्रतिनिधी:

youtube

बिटरगाव पोलीस स्टेशनची कामगिरी.अवैध दारु साठा जप्त

उमरखेड प्रतिनिधी:

पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांची कारवाई

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सोईट शेत शिवारात रात्री पोलिसांनी अवैध देशी दारू साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. २४/११/२०२५ सोमवार रोजी रात्री ११/०० वा पांडुरंग शिंदे ठाणेदार सा.पो.स्टे. बिटरगाव यांना गोपणीय खबर मिळाली कि ब्राम्हणगाव येथील इसम नामे विपीन माधवराव कोथळकर (३५)वर्षे हा त्याच्या सोईट शेत शिवारातील शेतात अवैध्यरित्या ३५ बॉक्स देशी दारू व्रिक्री करण्याच्या उददेशाने बाळगुन आहे. अशा खात्रीशीर माहीती वरूण पो.स्टे. स्टाफसह रेड केली असता आरोपी विपीन माधवराव कोथळकर हा घटनास्थळावरूण पळुन गेला.त्याच्या शेतातील विहीरी जवळ दोन बॉक्स देशी दारू एकुन नग ९५ काचेच्या बॉटल देशी दारू भिंगरी संत्रा प्रत्येकी बॉटल किं.अ.९०रू प्रमाणे एकुन किं.अ. ८५५०/रू. मुदद्देमाल अवैध्यरित्या मिळुन आला असता आल्याने घटनास्थळावरूण नमुद पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही कुमार चिता पोलीस अधिक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड याच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरिक्षक पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार पोहवा / संतोष चव्हाण, पोहवा/राहुल कोकरे, पोकों, प्रविण जाधव, पोकों, सुदर्शन जाधव, पोकों, अंबादास गारूळे यांनी केली.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “बिटरगाव पोलीस स्टेशनची कामगिरी.अवैध दारु साठा जप्त उमरखेड प्रतिनिधी:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!