बाळासाहेब सोनवणे यांची ACCI च्या दिव्यांग विभाग राज्य उपाध्यक्षपदी निवड नाशिक | प्रतिनिधी
बाळासाहेब सोनवणे यांची ACCI च्या दिव्यांग विभाग राज्य उपाध्यक्षपदी निवड
नाशिक | प्रतिनिधी
आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ACCI) च्या दिव्यांग विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शासन मान्यता प्राप्त दिव्यांग अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब दादा सोनवणेसर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.यावेळी आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे राष्ट्रीय अध्यक्ष रसेन कुमार यांनी बाळासाहेब सोनवणे यांची निवड जाहीर केली असून, प्रदेश अध्यक्षा भाग्यश्री वर्तक यांनी मुंबई येथे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.यावेळी संस्थेचे सल्लागार मिलिंद चौधरी यांनी अभिनंदन केले.
बाळासाहेब सोनवणे यांची यापूर्वीच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र असून महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयात उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने ५० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक म्हणूनही ते प्रभावीपणे कार्य करत आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच दिव्यांग कर्मचारी-अधिकारी व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण,मार्गदर्शन व पुनर्वसनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ACCI च्यावतीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
निवडीप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब सोनवणे म्हणाले की,“राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, मार्गदर्शन, पुनर्वसन तसेच त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले जाईल. महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.




Istanbul tour from Pamukkale The local experiences were authentic and memorable. https://www.iglinks.io/echoll-3ge