उमरखेड नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड : ( बांधकाम प्रकाश शिकारे , आरोग्य वीरेंद्र खंदारे , शिक्षण रसूल पटेल तर पाणीपुरवठा स्वाती ठाकरे )

youtube

उमरखेड नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड :

( बांधकाम प्रकाश शिकारे , आरोग्य वीरेंद्र खंदारे , शिक्षण रसूल पटेल तर पाणीपुरवठा स्वाती ठाकरे )

उमरखेड : – येथील नगरपालिकेच्या विविध विषय सभापतींची आज नगर परिषदेच्या सभागृहात आयोजीत सभेत निवड करण्यात आली आहे . उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमधील असलेली अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न याविषयी समिती सभापतीच्या निवडीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसत आहे .
नगर परिषदेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन यांचे सह सर्व समित्यांचे सभापती व भाजपाकडून सुरेंद्र कोडगीरवार तर जनशक्ती पॅनल कडून गोपाल अग्रवाल व साजिदउल्ला जहागीरदार यांचा समावेश करण्यात आला आहे . याशिवाय इतर सहा विषय समितीच्या सभापतीपदी
उपाध्यक्ष जुबेर कुरशी यांच्याकडे नियोजन समिती , उबाठा च्या स्वाती गजेंद्र ठाकरे पाणीपुरवठा सभापती पदी प्रकाश शिकारे यांची बांधकाम सभापती पदी , विरेंद्र खंदारे यांची आरोग्य सभापती पदी , फरजाना सय्यद रहीम यांची महिला व बालकल्याण सभापती पदी तर महत्त्वपूर्ण असलेल्या शिक्षण सभापतीपदी रसुल पटेल यांची निवड करण्यात आली आहे .
या सभापती पदासोबतच स्थायी समिती मधील सदस्यांची निवड व सर्व विषय समित्या मधील सदस्यांची निवडही या विशेष सभेत करण्यात आली आहे . येथील नगरपालिकेवर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व जनशक्ती पॅनलच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जनशक्ती पॅनल तयार केली होती .त्यांचेकडे अध्यक्षपद तसेच 17 नगरसेवक असे संख्याबळ असून विरोधक भाजपाकडे नऊ नगरसेवकांची संख्या आहे .
स्थायी समिती , सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी सखाराम मुळे व मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे यांनी पार पाडली .
यावेळी जनशक्ती पॅनलचे कार्यकर्ते तथा नगरसेवक व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते .

चौकट :
स्थायी समीती अध्यक्ष – नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन
नियोजन समिती – जुबेर कुरेशी ( उपाध्यक्ष )
शिक्षण समिती सभापती – रसुल पटेल .
बांधकाम समिती सभापती – प्रकाश शिकारे
आरोग्य समिती सभापती – विरेंद्र खंदारे
महिला व बालकल्याण सभापती – फरजाना सय्यद रहिम
पाणी पुरवठा सभापती – स्वाती गजेंद्र ठाकरे
( सोबत फोटो )

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!