उमरखेड तालुक्यात अवकाळीचा हाहाकार; रब्बी पिके मातीत, हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी उमरखेड (प्रतिनिधी):
उमरखेड तालुक्यात अवकाळीचा हाहाकार; रब्बी पिके मातीत, हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी
उमरखेड (प्रतिनिधी):
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निसर्गाच्या लहरीपणाचा फटका उमरखेड तालुक्याला बसला असून, गेल्या तीन दिवसांपासून (२३ ते २५ फेब्रुवारी) झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीमुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तालुका काँग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेत शासनाकडे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.
पिकांचे अतोनात नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध भागांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, चना, ज्वारी, मक्का, केळी आणि भाजीपाला ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषतः जंगल पट्ट्यातील इसापूर, निंगणूर, खरबी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने उभी पिके अक्षरशः मातीत मिसळली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
प्रशासनाला निवेदन सादर
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तराव बापूराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
नुकसानग्रस्त भागाचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
बाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करावी.
पावसाळ्यातील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान आणि पीक विमा त्वरित वितरित करावा.
राजकीय नेत्यांचे लक्ष वेधले
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री संजय राठोड, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार किसनराव वानखेडे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
यावेळी उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री दतराव शिंदे साहेब, मा.रामभाऊ देवसरकर साहेब अध्यक्ष अखील भारतीय कुणबी समाज यवतमाळ, डॉ कल्याणराव राणे,मा.गणेश बेले,मा.रामदास कदम,मा.प्रभाकरराव कदम,मा.गवतम दवणे,मा.गजानन भारती महाराज युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान पठाण यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता शासन या नुकसानीची दखल कधी घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




Điểm cộng lớn của 888slot freebet nằm ở tính minh bạch trong mọi hoạt động. Kết quả trò chơi được cập nhật công khai, tỷ lệ cược rõ ràng, giúp người chơi dễ dàng kiểm soát và đưa ra chiến lược phù hợp. TONY03-18O
Bạn có thể đặt cược tự động theo chiến lược tại xn88 bshrf – tiết kiệm thời gian và duy trì kỷ luật cá cược. TONY03-20
**mounja boost**
MounjaBoost is a next-generation, plant-based supplement created to support metabolic activity, encourage natural fat utilization
**purdentix**
PurDentix is a revolutionary oral health supplement designed to support strong teeth and healthy gums. It tackles a wide range of dental concerns
**aqua sculpt**
AquaSculpt is a high-quality metabolic support supplement created to help the body utilize fat more efficiently while maintaining steady, reliable energy levels throughout the day.
Đây là phương thức liên hệ phổ biến và nhanh chóng nhất tại 888slot com . Bạn có thể dễ dàng truy cập tính năng trò chuyện trực tiếp ngay trên website hoặc ứng dụng di động của nhà cái. Nhân viên hỗ trợ khách hàng của trang web luôn sẵn sàng túc trực 24/7 để giải đáp mọi thắc mắc của bạn một cách chuyên nghiệp và tận tình. TONY03-11O
Sự tin tưởng của quý khách là động lực to lớn để 188V liên tục cải tiến và mang lại những giá trị vượt trội trong từng sản phẩm dịch vụ. TONY03-09
Nhóm 5: Tổng hợp & Kêu gọi hành động (CTA) (20 đoạn) TONY03-04