शॉर्टसर्किटमुळे तीन एकर गहू जळून खाक ( शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान ) उमरखेड :-

youtube

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर गहू जळून खाक

( शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान )

उमरखेड :- शेतावरून जाणाऱ्या जिवंत विद्युत तारांचा एकमेकाला घर्शन झाल्याने लागलेल्या आगीत तीन एकर चा काढणीला आलेला गहू जळून खाक झाल्याची घटना दिनांक दहा रोजी दुपारी चार वाजता नागापूर रूपाला शेत शिवारात घडली या आगीमध्ये दोन शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले असून नगरपरिषद च्या अग्निशमन दलाने त्वरित पोहोचून आग आटोक्यात आणल्याने शिवारातील इतर शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू वाचला .
प्राप्त माहितीनुसार नागापूर शिवारात शेत असलेल्या रेहाना सय्यद अख्तर यांच्या शेतावरील लोंबकळत असलेल्या जिवंत विद्युत तारांचे जोरात सुटलेल्या हवेमुळे एकमेकाला घर्षण होऊन त्यातून निघालेली ठिणगी काढणीला आलेल्या गव्हावर पडल्याने गव्हाला आग लागली .हवा जोरात सुरू असल्याने आजीने रुद्र रूप धारण केले .त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकरी व मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला .सदर आग लागल्याची घटनेची माहिती नगरपरिषद अग्निशमन दलाला मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन पथक आग विझवण्यासाठी गेले .परंतु तोपर्यंत रेहाना सय्यद अख्तर यांचा दोन एकर व रोहित तामसकर यांचा एक एकर गहू जळून खाक झाला .

चौकट
वीज वितरण कंपनीच्या सर्विस लाईन अनेक शेतामध्ये लोमकळत असून त्यासाठी शेतकरी विभागाच्या चकरा मारतात परंतु त्याकडे विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना लाखाचे नुकसान सोसावे लागले .
( सोबत फोटो )

1 thought on “शॉर्टसर्किटमुळे तीन एकर गहू जळून खाक ( शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान ) उमरखेड :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!