अखेर चौथ्या दिवशी ‘त्या’ माकडाला पकडण्यात यश वनविभागाची युद्ध पातळीवरील मेहनत झाली सफल भवानी –

youtube

अखेर चौथ्या दिवशी ‘त्या’ माकडाला पकडण्यात यश
वनविभागाची युद्ध पातळीवरील मेहनत झाली सफल
भवानी –

 

पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी मंगळवारी आलेल्या वनविभागाच्या पथकाकडून एक चूक झाली होती. माकडाला बेशुद्ध करण्यासाठी झाडलेली ट्रॅन्क्विलायझर गन चुकून एका नागरिकाला लागली. उमरखेड तालुक्यातील भवानी येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. गेल्या काही दिवसांपासून भवानी येथे एका पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता. या माकडाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, तेव्हा माकडाला बेशुद्ध करण्यासाठी शूटरने निशाणा धरला. मात्र, माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा अचूक निशाणा चुकला आणि ट्रॅन्क्विलायझर गनमधून सुटलेले इंजेक्शन (डार्ट) थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे रा. डोंगरगाव (वय ४५) यांना जाऊन लागला होता. त्यामुळे मंगळवारी खराटे यांच्या वर शासकीय आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर सदर घटनेच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रकाशित झाल्यानंतर आज शनिवार पर्यंत भवानी गावात वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी हे तळ ठोकुण युद्ध पातळीवर ‘त्या माकडाला पकडाण्यासाठी प्रयत्न करत होते .परंतु काल पर्यंत त्यांना माकडाला पकडण्यात त्यांना यश आले नव्हते. आज घटनेच्या चौथ्या दिवशी सकाळ पासुन दुपारी तिन -चार वाजे पर्यंत महत्प्रयासाने ‘त्या’ माकडाला सोईट(घ) येथे झाडावर बसुन असतांना ट्रॅन्क्विलायझर गनमधून इंजेक्शन (डार्ट) मारुन बेशुद्ध करुन पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. आता त्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीत ठेवून शुध्दी वर आल्या वर पुढील नियोजन वनविभागाचे अधिकारी करतील.
या ऑपरेशन मध्ये वनक्षेत्र अधिकारी वंन्य जिव विभाग कोरटा विशाल झांबरे, क्षेत्र सहायक धनंजय व्यवहारे, वनरक्षक डाके साहेब,पशुवैद्यकीय अधिकारी चिखली गोपाल गव्हाड, पोलिस कर्मचारी व वनविगाची टिम तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने मदत करत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “अखेर चौथ्या दिवशी ‘त्या’ माकडाला पकडण्यात यश वनविभागाची युद्ध पातळीवरील मेहनत झाली सफल भवानी –

  1. Ứng dụng di động của xn88 link là sự kết tinh của công nghệ hiện đại, mang lại tốc độ truy cập thần tốc và tính ổn định tuyệt đối trên mọi hệ điều hành. TONY03-18O

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!