विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्यावर प्राणघातक हल्ला  उपचारादरम्यान आज छ. संभाजीनगर येथे मृत्यू

youtube

 

 

विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्यावर प्राणघातक हल्ला
उपचारादरम्यान आज छ. संभाजीनगर येथे मृत्यू

हदगांव / प्रतिनिधी
विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगांव येथील शिक्षक गणेश गुड्डा यांचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काही अज्ञात व्यक्तींनी डोक्यात मारल्याने आज दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर झालेला हल्ला हा कोणी व कशासाठी केला हे एक गुढच आहे. याप्रकरणी गणेश गुड्डा यांनी हदगांव येथून भाड्याने नेलेल्या कारचे चालक अनिल शिंदे यांना चौकशीसाठी चिखली पोलिसांनी तब्येत घेतले आहे.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर जवळील तालुक्याचे ठिकाण असलेल्या जळकोट येथील गणेश गुड्डा हे मुळचे रहिवासी आहेत. ते हदगांव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या उंचेगाव (खु.) येथील अनिल शिंदे नावाच्या एका मित्राची कार मंगळवारी भाड्याने घेऊन ते हदगांव येथून सकाळी सहा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर साठी गेले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्या कार चालकाचा फोन गणेश यांच्या मेहुण्याच्या मोबाईलवर आला. त्यावेळी त्याने आम्ही छत्रपती संभाजीनगर हून चिखली येथे आलो असून गणेश गुड्डा सर यांचा अपघात झाला आहे. गाडीतून उतरून दुकानावर जाऊन पाण्याची बॉटल घेऊन परत येत असतांना रस्त्यावरून जाणाऱ्या कारणे त्यांना उडवले असे सांगितले. ते गंभीर जखमी आहेत त्यांना आम्ही बुलढाणा येथे दवाखान्यात घेऊन चाललो आहोत असे सांगितले. ही बातमी कळताच त्यांचे मेहुणे हदगांव येथील प्रसिद्ध फोटोग्राफर वैजनाथ गुडूप व त्यांचे मित्र राहुल बहादुरे हे तातडीने बुलढाणा येथे पोहोचले. तेथे गणेश गुड्डा यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. परंतु तेथे न्यूरोसर्जन नसल्यामुळे रुग्णाला छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे या सर्वांनी तेथून लगेच रात्री छत्रपती संभाजी नगर घडले तिथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज दुपारी गणेश गुड्डा सर यांची प्राणज्योत माळवली.
मयत गणेश गुड्डा यांचे मेहुणे वैजनाथ उडूप यांनी घटनेची अधिक चौकशी केली असता सोबत असलेल्या कार चालकाने सांगितले की, आम्ही ज्यांना भेटायला आलो होतो त्या व्यक्तींनी मोबाईलवर संभाजीनगर येथून बुलढाणा येथे व तिथून चिखली येथे बोलावले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काही अनोळखी लोकांनी ज्या ठिकाणी आम्ही थांबतील होतो त्याच्या विरुद्ध बाजूला कारमधून आले. त्यांचे काय व्यवहार होते हे आम्हाला माहीत नाही. परंतु गणेश यांनी सोबत नोटांची बंडल घेऊन कार कडे गेले. त्या कारमधील कोणीही बाहेर आले नाही. गणेश यांनी कारमध्ये खिडकीतून डोकावून देवाणघेवाण केली. थोड्याच वेळात ही कार गणेश यांना खिडकीत लटकवत, फरफटत सुसाट पळाली. आणि सुमारे १०० मीटरवर गुड्डा यांना त्या कार मधून ढकलून दिले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डोक्याला मोठ्या प्रमाणात मार होता. डोक्यातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाला होता. त्यामुळे आपण काही लोकांच्या मदतीने गाडीत टाकून रुग्णालयात नेले. लोकांच्या सल्ल्यावरून बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. आणि नंतर त्यांच्याच मोबाईलवरून वैजनाथ गुडूप यांच्या मोबाईल नंबरवर फोन केला. असा प्रकार झाल्याचे कारचालकाने सांगितल्याचे मयताच्या नातेवाईकाकडून कळाले. हदगांव येथून गणेश गुड्डा यांनी नेलेल्या कारचा चालक अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असून प्रचंड मानसिक तणावात असल्यामुळे व्यवस्थित बोलता येत नाही, असे सुद्धा नातेवाईकांनी सांगितले.
गणेश गुड्डा यांच्या डोक्यात मोठ्या वस्तूने आघात केल्यामुळे कवटी फुटली असून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे हा घातपातच असल्याचा अंदाज छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मयताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून तपास करण्यासाठी सदर अनिल शिंदे नावाच्या हदगांवच्या कार चालकाला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सुद्धा समजते. गणेश गुड्डा या शिक्षकावर हल्ला करणारे कोण होते? त्यांचा व्यवहार काय होता? इत्यादी प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. संपूर्ण पोलीस तपासातच सत्य काय आहे ते बाहेर येईल. गणेश गुड्डा यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

2 thoughts on “विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्यावर प्राणघातक हल्ला  उपचारादरम्यान आज छ. संभाजीनगर येथे मृत्यू”

  1. I’ve been trying a few platforms lately and this one really stands out. The interface is smooth and the payouts are surprisingly fast. Definitely a great spot for anyone looking for a reliable experience. Check out krwin12kr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!