दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या बांधावर नितीनभाऊ भूतडा यांची दिवाळी..!

youtube

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या बांधावर नितीनभाऊ भूतडा यांची दिवाळी..!

अमोल चटणे यांच्या शेतात जाऊन कुटुंबीयांसोबत साजरा केला दीपोत्सव; बालगोपालांना फटाक्यांचे वितरण.

फुलसावंगी प्रतिनिधी /
राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना बळीराजाच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा नेते तथा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नितीनभाऊ भूतडा यांनी फुलसावंगी-चिल्ली परिसरातील शेतकरी अमोल पांडुरंग चटणे यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी कुटुंबाला दिवाळीच्या सणात आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या भावनेतून नितीनभाऊ भूतडा यांनी चटणे कुटुंबीयांची शेतावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी अमोलभाऊ चटणे व अश्विनीताई चटणे यांना दिवाळीनिमित्त कापड आहेर व खते, बी-बियाणे भेट स्वरूपात देत शुभेच्छा प्रदान केल्या. तसेच गोड खाद्यपदार्थांची भेट देऊन चटणे परिवारातील ऐश्वर्या, वेदिका व ऋषिकेश या बालगोपालांना फटाक्यांचे वाटप केले. शेतातच वास्तव्यास असलेल्या चटणे कुटुंबीयांनी केलेल्या आग्रहाच्या पाहुणचाराचाही त्यांनी मनमुराद आनंद घेतला.
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. दिवाळीच्या आनंदापासून शेतकरी कुटुंब वंचित राहू नये, हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता. नितीनभाऊ भूतडा यांच्या या भेटीमुळे चटणे कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली.
यावेळी मा.आ.विजयराव खडसे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण, मा. सरपंच विजयराव महाजन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, विधानसभा प्रमुख ॲड. अनिलराव माने,मंडळ अध्यक्ष योगेश बाजपेयी, गुरुदेव सेवा मंडळाचे नागोराव विडूळकर महाराज, बबनदादा शेळके, परमानंद पाटील, सुनील हिंगमिरे सर, संदेश मोरे, प्रभाकर हाके, प्रमोद शेळके, धनंजय शेळके, धनराज वानखेडे, प्रणित मैड, अमोल व्हडगिरे, विशाल राठोड, शाम आडे, दिनेश सोनुने, विजय जाधव व गजानन राऊत, बंडू लिमजे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!