सर्वांगीण विकास साधणारा अर्थसंकल्प ! जिल्हाध्यक्ष – नितीन भुतडा
सर्वांगीण विकास साधणारा अर्थसंकल्प ! जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा
उमरखेड –
आज शिंदे – फडणविस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मांडला. समाजातील सर्वांगीण विकासासाठी पंचामृत अर्थसंकल्प मांडला. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या पहिल्या अमृतात शेतकऱ्यांना केंद्राच्या आधारावर 6000 रूपये सन्मान निधी मिळणार आहे. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होईल.
दुसऱ्या अमृतात महीला, आदिवासी, मागासवर्ग आणि ओबीसी घटकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
तिसऱ्या अमृतात भरीव भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधासाठी भरीव तरतूद करण्यात आली.
चौथ्या अमृतात रोजगारनिर्मिती आणि पाचव्या अमृतात पर्यावरण पूरक विकासाचा समावेश करण्यात आला.
शेतकऱ्यांना सन्मान निधी, 1 रुपयात पिकविमा, लेक लाडकी योजना, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ,
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ,
शाळा महाविद्यालय अनुदान वाढ,
शिष्यवृत्तीत वाढ, आपला दवाखाना, विविध विकास मंडळ, पर्यटन आणि पर्यावरणासाठी भरीव तरतूद असल्याने हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधणारा अर्थसंकल्प ठरला आहे