भारताला आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प.
भारताला आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प
राष्ट्र गौरव माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने मोदीजींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत साकारणारा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य शोषित वंचित पीडित नागरिकांना त्यांच्या आर्थिक स्थिरतेला, धोरणाला व्यवस्थापन करण्याचा नवा मार्ग मिळेल आजच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रीन एप्रोच पद्धतीमुळे आपले जीवनमान सुधारेल अर्थसंकल्पातून पहिल्यांदाच मध्यमवर्गीयाना दिलासा मिळाला आहे सात लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल.
देशाच्या विकासासाठी सात प्राथमिक योजना तयार करून रोगमुक्त तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण साठी इकॉनॉमिक योजना व प्रगतिशील योजना तसेच रेल्वे मध्ये नागरिकांना सुविधाच्या नवीन परियोजना सुरू करण्याचा संकल्प यात आहे.
समाज हित राष्ट्रहित तसेच आदिवासी भागामध्ये एकल महाविद्यालय व आत्मनिर्भर भारत मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज तसेच समाजातील सफाई कर्मचारी घटकांचा विचार करून शहरातील नालासफाई मशनरी द्वारे करण्याचा निर्णय, लहान मुलांसाठी डिजिटल विद्यालय स्थापना करण्याचा निर्णय व मातृ शक्ती कल्यानाचे प्रतिबिंब आजच्या बजेट मध्ये दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली.
हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार करणारा अर्थसंकल्प आहे.
नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे.
देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचा देखील उचित विचार ह्या अर्थसंकल्पाने केला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.