ढाणकी नगरपंचायच्या विषय समिती सभापतीपदावर वंचितसह काॅग्रेसचे वर्चस्व.

youtube

ढाणकी नगरपंचायच्या विषय समिती सभापतीपदावर वंचितसह काॅग्रेसचे वर्चस्व.

भाजपाच्या टेकुने काॅग्रेसच्या तीन अन वंचितच्या दोन नगरसेवकांना सभापतीपदाची लाॅटरी.

ढाणकी प्रतिनीधी
आज झालेल्या ढाणकी नगरपंचायच्या विषय समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सह काॅंग्रेसने पाचही विषय समिती सभापती पदावर वर्चस्व मिळवीत भाजपाच्या टेकुने काॅंगंेसच्या तीन व वंचितच्या दोन नगरसेवकांच्या गळयात सभापती पदाची माळ बिनविरोध पडली.
31 जानेवारी रोजी नगरपंचायच्या सभागृहात पार पाडलेल्या निवडणुक प्रक्रियेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी न.पचे उपनगराध्यक्ष शेख जहिर शेख मौला , महिला व बालकल्यान समिती सभापती पदी शायदाबी शेख मिरांजी, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी काॅंग्रेसचे शंकर व्यंकोबा ताटीकुंडलवार, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी वंचित च्या बशनुरबी सैयद खलील, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापतीपदी वंचित चे संबोधी महेंद्र गायकवाड यांची वर्णी लागली.
या निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणुन उमरखेडचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी महेश जामनोर, नगरपंचायत चे लिपीक राजु दवणे यांनी काम पाहीले.
या सभेला निर्वाचित सदस्य 17 व नामनिर्देशित सदस्य दोन असे एकूण एकोणवीस सदस्य उपस्थित होते.
निवडणुक प्रक्रिया पडताना कोणताही वाद न होता ही प्रक्रीया शांततेत पार पडल्याने अतिशय खेळीमेळीचे वातावरण दिसुन आले. कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हण्ुान बिटरगाव चे ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. नवनिर्वाचीत सर्व सभापतींचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी पुष्पहार व पेढे भरवुन सत्कार केला. यावेळी काॅंग्रेसचे खाजाभाई कुरेषी, हमिद कुरेषी, रूपेश भंडारी, वंचितचे जिल्हा महा सचिव जाॅन्टी विनकरे, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, गजानन मिटकरे, साजिद भाई, अवधुत पाटील चंद्रे, ओमाराव पाटील चंद्रे, सुनिता घोडे, रमेश गायकवाड, अविनाश पंाडे, शिवाजी वैद्य, सुनिल चव्हाण, नितीन ठाकुर, राहुल चंद्रे, मनसेचे सादीक भाई, शिवसेनेचे रमेश पराते, शेख कामिल, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकी नगरपंचायच्या विषय समिती सभापतीपदावर वंचितसह काॅग्रेसचे वर्चस्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!