नवरात्री निमित्याने अष्टभुजा दुर्गात्सव मंडळ येथे पार पडला नारीशक्तीचा सत्कार.

youtube

नवरात्री निमित्याने  अष्टभुजा दुर्गात्सव.मंडलथे पार पडला नारीशक्तीचा सत्कार :

उमरखेड प्रतिनिधी :

येथील स्थानिक अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळ यांच्या संकल्पनेतून नारीशक्ती मातेचा सन्मान करण्याचा उपक्रम दि 30 सप्टेंबर रोजी
शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व मोलाची कामगिरी करणाऱ्या नारीशक्ती मातेचा सत्कार अष्टभुजा दुर्गात्सव मंडळ च्या वतीने मान्यवर महिलांच्या हस्ते थाटात पार पडला .
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जैतूनबी शेख शब्बीर व बालमनी बालकिसन नांदेडकर तसेच दायीमा व आयुर्वेदिक उपचार म्हणून गर्भवती महिलांच्या वेदनेपासून तर प्रसुती पर्यंत लक्ष देणाऱ्या गयाबाई विश्वनाथ आलट, इंदुबाई शिवरामजी कलाने ,लक्ष्मीबाई किसनराव जोगदंड, हिराबाई नथू दिवेकर ,इंदुबाई भगवान इंगळे, चंद्रभागाबाई मारोतराव टकले या मातेचा विशेष कार्याबद्दल यांना साडीचोळी देऊन यावेळी मान्यवर महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
तसेच नगरपरिषद येथे सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गीताबाई किशोर पटोणे या महिलांचाही उल्लेखनीय कार्य केल्या बद्ल कार्यक्रमात सत्कार करण्यात आला .
सामाजिक क्षेत्रात गर्भवती मातेचा इलाज करून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या या मातेला पुरुषप्रधान संस्कृतीला विशेष परिचय करून देणाऱ्या सदरहू कर्तबगार महिलाचा भावनिक सत्कार एपीआय सुजाता बनसोड ,वैशाली प्रवीण कुमार वानखेडे ,तेजश्री संतोष जैन ,मीना चेके व महिला पत्रकार सविता चंद्रे यांच्या हस्ते
साडी चोळी देऊन करण्यात आला एकूण नऊ नारी शक्तीचा सत्कार व सन्मान या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावयास मिळाला .सदरहू आयोजित सत्कार कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील महिला व जेष्ठ नागरिक, युवक ,युती तसेच अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळातील सदस्य यांच्या समवेत नारीशक्ती मातेचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद ओझलवार यांनी केले तर सूत्रसंचालन शितल प्रफुल कोमलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा अरविंद ओझलवार यांनी केले.मालती टकले , सुनिता यन्नावार , अर्चना वानखेडे , चंदा नरवाडे , प्रिती पानपट्टे यांनी परीश्रम घेतले .

Google Ad
Google Ad

1 thought on “नवरात्री निमित्याने अष्टभुजा दुर्गात्सव मंडळ येथे पार पडला नारीशक्तीचा सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!