डॉ.विवेक पत्रे व त्याच्या परिवाराने केली अनाथ मुलां सोबत दिवाळी साजरी.
डॉ.विवेक पत्रे व त्याच्या परिवाराने केली अनाथ मुलां सोबत दिवाळी साजरी..
नांदेड..
निवघा बाजार ( बातमीदार ) ता.२४,,, ”आला आला दिवाळी सण , नाही आनंदाला तोटा ” अस असतांना सुध्दा गरीबी मुळे अनेकांच्या घरात ना दिप . ना फराळ ‘ ना नविन कपडे अशा स्थीती मध्ये अनेकांची दिवाळी जाते . परंतू आपण तर आनंदात दिवाळी साजरी करुन खूप पैसा खर्च करतो . परंतू समाजाच काही देण लागतं आणि सामाजीक बांधीलकी जपत उमरखेड जि. यवतमाळ येथील डॉ . विवेक पत्रे यांनी त्यांच्या परीवारा सह शिरड ता . हदगाव येथील ज्या विद्यार्थ्यचे वडीलांचे छत्र हरवले अशा विद्यार्थाना नवीन कपडे व मिठाई देऊन उत्साहात दिवाळी साजरी केली . शिरड येथील ” आधार मदतीचा ” हा व्हॅटस्प ग्रुप समाजसेवे चे काम करतो या ग्रुप च्या सद्स्यांच्या डॉ . विवेक पत्रे संपर्कात आल्यावर ग्रुप च्या वतीने त्यांना माहीती देण्यात आली होती . दिवाळी निमित्त ज्या मुलांच्या वडीलांचे छत्र हरवले अशा २१ विद्यार्थ्यना इयत्ता १ली ते ७वी तील मुलामुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले . राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल शिरड येथे अनाथांना मदतीचा हात या आधार ग्रुप शिरड च्या वतीने उमरखेड येथील डॉ विवेक पत्रे व त्यांच्या परीवाराने डॉ.सौ. वेदिका पत्रे, देवयानी पत्रे, अॅड. वैभव पत्रे, डॉ.मुसफिक, डॉ. चौधरी, डॉ. कोल्हे, यांनी नवीन कपडे वाटप अनाथ मुलांना वाटप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष कदम सर यांनी केले तर प्रास्तावीक शाम पाटील यांनी केले. यावेळी बालाजी कलाने उपसरपंच, संजय कल्यानकर बाबाराव बॊरकर , दिनेश चौरे, रामेश्र्वर बॊरकर, आधार ग्रुप शिरड चे सर्व सदस्य शाम पाटील, प्रेमानंद पाटील, शिवशंकर गुंजकर , संदीप देशमुख जयेश कदम कुणाल शिरडकर,दयानंद कलाने, रमेश शिरडकर आदी उपस्थित होते…
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!