उपजीवीकेचे साधन विकुन स्वताच्या मुलीला बनविले डाॅक्टर.

youtube

उपजीवीकेचे साधन विकुन स्वताच्या मुलीला बनविले डाॅक्टर

मुळावा : आपली मुलं शिकून मोठी व्हावी हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच असतं हेच स्वप्न उराशी बाळगून मिळेल ते काम करत आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण देत कर्तुत्ववान होईल हीच इच्छा असते आणि अशाच एका पित्याने आपल्या मुलीचं डॉक्टर होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी उपजीविकेच साधन विकून मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

ही संघर्षाची कहाणी आहे मुळावा येथील शेख हमजा या कृझर गाडी चालक व मालकाची. मुळावा व परीसरात हमजा मामु म्हणुन ते परीचीत आहेत. आपला प्रपंच सुरळीत सुरु असतांना त्यांची मोठी मुलगी ही दहावीत 82 % गुण घेऊन उतीर्ण झाली व मुलीने डाॅक्टर होण्याची ईच्छा वडीलाकडे व्यक्त केली मुलगी हुशार आहे, याची कल्पना त्यांना होतीच तेव्हा घरात चर्चा करुन त्यांनी निर्णय घेतला कि मुलीचे पुढील शिक्षण हे नांदेडला करावयाचे तेव्हा पैशाची जुळवाजुळव होत नव्हती मग त्यांनी उपजीवीकेचे साधन असलेली आपली क्रुझर गाडी विकण्याचा निर्णय घेतला. आणि गाडी विकल्या नंतर मुलीला नांदेडला पुढील शिक्षणासाठी पाठवले.

सालेहा तकीम शेख हमजा हिचे प्राथमीक शिक्षण जिल्हा परीषद उर्दु शाळा मुळावा येथे झाले व माध्यमिक शिक्षण मनोहरराव नाईक उर्दु शाळा मुळावा येथे झाले, जून 2016 ला दहावी उत्तीर्ण झाल्या नंतर तिने
मदीनातुल उलूम जूनियर कॉलेज नांदेड़ येथे नियमित वर्ग करून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले तिला बारावी मध्ये 72 % गुण मिळाले, दहावी पेक्षा बारावीत गुणाची टक्केवारी कमी झाली तरी तिने आपली जिद्द कायम ठेवत एक वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास करत नीटची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. बि .ए .एम .एस च्या शिक्षणाकरीता 2019 मध्ये जालण्याच्या डाॅ वेद प्रकाश पाटील आयुर्वेदीक काॅलेज मध्ये प्रवेश मिळविला व 2024 ला पुर्ण शिक्षण घेत डाॅक्टर होवून वडीलांचा विश्वास व मेहणतीचे सार्थक केले. तीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील ,मार्गदर्शक शिक्षक आणि काकांना दिले आहे.

चौकट

ईच्छा शक्ती असेल तर कोणत्याही परीस्थीवर मात करता येते..

घरची परीस्थीती बेताचीच होती लहान पणापासुनचे माध्यमिक पर्यतचे शिक्षण ग्रामिण भागात झाल्याने शहरातील शिक्षण कसे असेल निट परीक्षेचे नियोजन कसे करावे असे प्रश्न मणात होते पंरतु माझे स्वप्न हे डाॅक्टर बनण्याचे होते त्यासाठी पुर्वी पासुनच अभ्यासाचे सातत्य ठेवले व शहरामध्ये शिक्षण घेत असतांना वडीलांनी आपल्या साठी किती कष्ट केले याची जान व त्यांचा चेहरा नेहमीच डोळ्यासमोर ठेवुन अभ्यास केला आज वडीलांच्या मेहनतीचे चीज झाल्याने आनंद होत आहे.

डॉ. सालेहा तकीम शेख हमजा.

 

फोटो :- सालेहा शेख आपल्या वडीला सोबत;

Google Ad
Google Ad

3 thoughts on “उपजीवीकेचे साधन विकुन स्वताच्या मुलीला बनविले डाॅक्टर.

  1. What i do not realize is in fact how you are no longer actually much more wellfavored than you might be right now Youre very intelligent You recognize thus considerably in relation to this topic made me in my view believe it from numerous numerous angles Its like men and women are not fascinated until it is one thing to do with Lady gaga Your own stuffs excellent All the time handle it up

  2. I sincerely enjoyed what you have produced here. The design is refined, your authored material trendy, yet you appear to have obtained a degree of apprehension regarding what you aim to offer next. Certainly, I shall return more frequently, just as I have been doing almost constantly, provided you uphold this incline.

  3. I really enjoyed what you have accomplished here. The outline is elegant, your written content is stylish, yet you seem to have acquired a bit of apprehension over what you aim to convey next. Undoubtedly, I will revisit more frequently, just as I have been doing nearly all the time in case you sustain this upswing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!