अ. गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळेत क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ
अ. गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळेत क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ
उमरखेड दि 23
अ. गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
याकार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून न.प चे मुख्याधिकारी महेशकुमार जामनो र, हे होते तर. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, , यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी माजी. नगराध्यक्ष सिद्दिक कुरेशी ज्येष्ठ पत्रकार मजर उल्ला खान
सै इरफान एम आय एम जिलाध्यक्ष , , जियाउलहक टेलर माजी नगरसेवक
शहाबुद्दीन कुरेशी एम आय एम तालुकाअध्यक्ष,आसिफ़ अहमद
आफाक तनवीर , , अ. जलील मास्टर आणि शकील भाई सामाजिक कार्यकर्ते यांची या प्रसंगी उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला व आपली गुणवत्ता सिद्ध केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वतीने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहत अन्सारी व शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समीती यांनी विशेष प्रयत्न केले .