बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करंजी येथील कुख्यात गुंडाला अटक.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230829-WA0065-1024x462.jpg)
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करंजी येथील कुख्यात गुंडाला अटक
ढाणकी प्रतिनिधी – निलेश पिलवंड
रघुनाथ दत्ता माणिकवाड यांच्यावर एम .पी. डी .ए अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केला आसता जिल्हा धिकारी यांनी त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा सदरचे आदेश प्राप्त होताच बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुजाता बनसोडे यांनी त्यास शोधण्यासाठी विविध पथके तयार केली.आणि त्याचा शोध घेतला. शोधाअंती दि. 28/8/23 रोजी रात्री तो इस्लापूर जिल्हा नांदेड येथे मिळुन आल्याने, त्यास स्थानबध्द आदेश बजावून स्थानबध्द अंतर्गत अटक करण्यात आली.
रघुनाथ दत्ता माणिकवाड याच्या विरुध्द बिटरगाव पोलीस स्टेशन येथे चारी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, स्वतःच्या आईस जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्मक्ट या सारखे गुन्हे दाखल आहेत. गणेश उत्सव दुर्गा उत्सव धमचक्र परिवर्तन दिन कालावधीकरीता हद्दपार केले होते. त्याच्या विरुध्द चॅप्टर केसही करण्यात आली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याने थांबविल्या नाही आणि कायद्यास न जुमानता, त्याने त्याची गुन्हेगारी कृत्यु सुरुच ठेवली. त्याच्या गुन्हेगारीस बळी पडलेले सर्व सामान्य लोक त्यास घाबरून पोलीस ठाण्यास तक्रारही देत नव्हते.या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधिक्षक डॉ. पवनकुमार बनसोडे यांच्या मागदर्शनाखाली सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरुन सराईत गुन्हेगार रघुनाथ दत्ता माणिकवाड याला स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तिसरी कार्यवाही असुन या पूर्वी सन 2022/23 मध्ये तत्कालीन ठाणेदार प्रताप भोस येथे कार्यरत असताना अशा कारवाईसाठी दोन प्रस्ताव सादर केला होता आणि कायद्यान्वये दोघांनाही एक वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कोण बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुजाता बन्सोड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूरणे बीड जमादार मोहन चाटे निलेश भालेराव व पोलीस स्टेशन बिटरगाव यांनी केली.
ठाणेदार सुजाता बन्सोड सराईत गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्याची मोहीम या पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.