सत्यशोधकाने पँनल ने खोटयाला कवटाळले.

youtube

सत्यशोधकाने पँनल ने खोटयाला कवटाळले.
उमरखेड –
जिनिंग अँड प्रेशिंग सोसायटीची निवडणूक लागण्याच्या काही दिवस अगोदर जिजाऊ भवन उमरखेड येथे निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्येकर्ते कल्याणराव माने यांचे पुतणे डॉ विजयराव माने यांनी सर्वपक्षीय विचारविनिमय मिटिंग बोलाविली होती त्या मिटिंगमध्ये आपन राजकीय जोडे बाहेर ठेऊन तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्यात भ्रस्टाचार करून कारखाना बंद पाडून शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे अतोनात नुकसान करणाऱ्या, खरेदीविक्री संघ तोट्यात आणणाऱ्या आणि सर्वच सहकार क्षेत्राला पोखरून खाणाऱ्याना येथून दूर सारून आपल्याला शेतकरी व सर्वांच्या हितासाठी ही निवडणूक सत्यशोधक शेतकरी पॅनलच्या बॅनर खाली लढवायची असल्याची भूमिका बोलून दाखविल्याने तेव्हा त्यांच्या या भूमिकेमुळे आशेचा किरण वाटू लागला पण त्यांनी लगेच रंग बदलवून आता भ्रस्ट नेत्याच्या हातात हात देऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने ‘सत्यशोधकाने खोट्याला कवटाळले’ अश्या प्रतिक्रिया मतदारातून येत आहेत.
वसंत सहकारी साखर कारखाना बुडीत काढून व खसरेदीविक्रीसंघ तोट्यात आणून मागील कार्येकाळात जिंनप्रेशची जमीन विक्री काढायला निघालेल्या प्रकाश पाटील देवसरकर यांना आपण त्यांची जागा दाखवू असे जाहीररीत्या बोलून सर्व पक्षाला सोबत घेण्याच्या त्यांच्या भूमिकेला उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच तेव्हा साथ देण्याचे ठरविले होते पण वेळेवरच विजय माने यांनी आपल्या भूमिकेत बदल करून घेऊन प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सोबत घरोबा केल्याने आता लोकांत प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
या नाराजीला समोर जातांना त्यांनी शिंदे सेनेला सोबत घेऊन फार मिळविले असे नाही तर चितांगराव कदम यांनचिंच काय कोठेही मक्तेदारी आहे काय ? इतर दुसरे कोणाला संधी का दिली नाही यासह चितांगराव आणि एक ठेकेदार यांचे गोड संबंध यांचाही फटका बसण्याची श्यक्यता लोक बोलून दाखवीत आहेत.

भाजपा, शिंदे गट आणि विजयराव माने यांचे सोबत असलेला राष्ट्रवादीचा अर्धा गट हे सोबत येऊन काँग्रेच्या एकट्या राम देवसरकर यांचे विरोधात आज निवडणूक लढवित असले तरी यांचे भूतकाळातील राजकीय वैर विसरून आजच एकत्र कसे येतात यात यांचा कोणता स्वार्थ दडला हे न समाजण्याइतपत आम्ही अडाणी राहिलो नाहीत असेही लोक बोलून दाखवीत आहेत .आणि हातात घेतलेले काम पूर्ण करणे याशिवाय गोरगरीब विध्यार्थ्यांच्या साठी नांदेड सारख्या मोठ्या शहरातील क्लासेस सारखीच उमरखेड येथे क्लासेसची सोय उपलब्ध करून देणे आणि इतरही त्यांनी गावोगाव केलेले वेगवेगळ्या स्वरूपाची कामे व त्यांचा आजवरचा संपर्क हे रामभाऊ देवसरकर यांची जमेची बाजू असल्याने विजयापासून त्यांना कोणीच रोखू शकणार नाही अशी स्थिती सध्यातरी दिसून येत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!