उत्तरवार शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला एका माथेफिरू कडून बेदम मारहाण.

youtube

उत्तरवार शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला एका माथेफिरू कडून
बेदम मारहा

उमरखेड : –
येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे मागील 6 वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे ( माजी सैनिक ) सिद्धार्थ मारुती मुनेश्वर वय 50 वर्ष या सुरक्षारक्षकास एका माथेफिरूने शरीरावरील गणवेश फाडून बेदम मारहाण केल्याची घटना दि 9 एप्रिल रोजी दुपारी 4 च्या दरम्यान घडली .
आज येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे कर्तव्यावर असणारे माजी सैनिक सुरक्षा रक्षक सिद्धार्थ मुनेश्वर हे प्रवेशद्वारा जवळ उभे असताना एक माथेफिरू दवाखान्यात जात होता व तो बेताल वक्तव्य करीत डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत होता त्याप्रसंगी सुरक्षा रक्षक मुनेश्वर यांनी त्या माथेफिरुला घरी जाण्यास सांगितले परंतु त्याने कोणाचेही न ऐकता तेथील एका वार्डबॉय वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या मुनेश्वर व तेथील वार्ड बॉय विशाल यांना शरीरावरील गणवेश पाटोस्तर मारहाण केल्याची घटना घडली .
सदर प्रकार सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या इसमाल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानी कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी लगेच पोलीस स्टेशन उमरखेड येथे संपर्क साधून पोलिसांचा ताफा शासकीय रुग्णालय येथे बोलवण्यात आले व त्या माथेफिरूस पोलीस स्टेशन उमरखेड येथे अटक करण्यात आले व पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन करीत आहेत .

Google Ad
Google Ad

1 thought on “उत्तरवार शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला एका माथेफिरू कडून बेदम मारहाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!