४८ मोटरसायकल व एक मोटर पंप असा एकूण २८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. [यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230831-WA0410-1024x461.jpg)
४८ मोटरसायकल व एक मोटर पंप असा एकूण २८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
[यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.]
ढाणकी –
उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस न आलेले गुन्हे, तसेच अवैध धंद्याबाबत, गोपनीय माहिती संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, दिनांक ३० ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीवरून, निलेश नारायण सुर्यवंशी रा. वरवट ता. हदगाव जि. नांदेड याने पुसद व उमरखेड शहरातून, मोटरसायकल चोरी केल्या असून त्या मोटरसायकली त्याचे ताब्यात आहेत.सदर माहितीवरून वरवट येथे जाऊन निलेश नारायण सुर्यवंशी यास ताब्यात घेऊन, त्यास विचारपूस केली असता त्याने यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ३१ मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केल्याने, त्याचे जवळून चोरीच्या ३१ मोटरसायकली एकूण १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोटरसायकल चोरी व इतर साहित्य चोरी करणारे त्याचे इतर साथीदार, यांचे नाव सांगितले आहे. पोलीस स्टाफचे मदतीने सावळेश्वर, ढाणकी, हिमायतनगर परिसरातून सिद्धार्थ प्रभू काळबांडे रा. सावळेश्वर ता. उमरखेड, अनिल सुभाष रावते रा. सावळेश्वर, तानाजी उर्फ ओंकार रघुनाथ कत्तलवाड रा. ढाणकी ता. उमरखेड, परमेश्वर रंगराव डाके रा. हिमायतनगर जि. नांदेड व राजु नामदेव काळबांडे रा. सावळेश्वर ता.उमरखेड यांना ताब्यात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, सिद्धार्थ प्रभू काळबांडे याचे ताब्यातून ३ मोटरसायकल १ लाख ८० हजाराचा मुद्देमाल, अनिल सुभाष रावते याच्या जवळून ७ मोटरसायकल ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल, तानाजी उर्फ ओंकार रघुनाथ कत्तुलवाड याचे ताब्यातून ५ मोटरसायकल ३ लाख रुपयांचा मुद्देमाल, परमेश्वर रंगराव डाके याचे ताब्यातून २ मोटरसायकल १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल, व राजु नामदेव काळबांडे याचे ताब्यातून चोरीचा मोटारपंप १७ हजाराचा मुद्देमाल, असा एकूण ४८ मोटरसायकल व १ मोटर पंप २८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून, पोलीस स्टेशन वसंतनगर अप. क्रमांक २०१/२०२२ कलम ३७९ भादंवी, पोलीस स्टेशन उमरखेड अपराध क्रमांक ५३३/२३ कलम ३७९ भादंवी, पोलीस स्टेशन बिटरगाव अपराध क्रमांक ३३९/२३ कलम ३७९ भादंवी असे चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले असून, हस्तगत केलेल्या मोटरसायकलची माहिती घेणे सुरू असून, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे?
या गुन्ह्यातील सदर आरोपी यांचे सह, जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन वसंतनगर पुसदचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोने, गणेश वनारे, गजानन गजभारे, अमोल सांगळे, पोलिस अंमलदार बबलू चव्हाण, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, पंकज पातुरकर, सुनील पंडागळे, मोहम्मद ताज, दिगंबर गीते, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर व सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सदरची कारवाई ही यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असून, या कारवाईमुळे चोरी करणाऱ्या चोरांचे चांगलेच धाबे दणाणले असून, या दबंग कारवाईमुळे भविष्यात चोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो ? म्हणून ढाणकी परिसरात सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
चौकट –
गोपनीय माहितीवरून सर्वप्रथम बिटरगाव पोलीस स्टेशनला, ढाणकी व परिसरात चोरीच्या गाड्या असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही शोध घेतला असता, सर्वप्रथम ९ मोटरसायकल आम्ही ताब्यात घेतल्या.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास पुढे सुरू केला.
चोरी करणारा जेवढा मोठा गुन्हेगार, तेवढाच चोरीच्या वस्तू विकत घेणारा सुद्धा मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे सामान्य नागरिकांनी गाडी घेते वेळेस घेणारा व विकणारा दोन्ही व्यक्तीने, कागदपत्राची पूर्ण खातरजमा करून नंतरच खरेदी विक्री करावी. असं सामान्य नागरिकांना आवाहन करते.
सुजाता बनसोड
ठाणेदार बिटरगाव पोलीस स्टेशन.