बाईपणाच जगण , विस्तवाशी सोयरपण  उन्हातल्या जिंदगीला सावलीच परकेपण – श्रीनिवास मस्के..

youtube

बाईपणाच जगण , विस्तवाशी सोयरपण
उन्हातल्या जिंदगीला सावलीच परकेपण

उमरखेड :

बाईपणाच जगणं , विस्तवाशी सोयरपण, तिचे झाले या कष्टाने निबर डोळे, घेतले पुन्हा कर्जाने आसव थोडे , उन्हातल्या जिंदगीला सावलीच परकेपण .. काबडकष्ट करणाऱ्या समस्त शोषीत महिल्याच्या व्यथा श्रीनिवास मस्के यांनी आपल्या पहाडी आवाजाने मांडल्या .
टाळ्यांच्या गडगडात कविंनी भरभरून दाद घेतली .
कधी येणार सुगीचा काळ शेतीला , अजुनी थांबले कुठे येथील गळफास मोदीजी, कधी देणार आमचे पंधरा लाख मोदीजी , या सुरेश धनवे यांच्या कवितेने ‘
शेतकऱ्यांच्या आजच्या संघर्षशील वर्तमाना बद्दल , आजच्या समाज व्यवस्थेबाबत , तरुण पिढीबाबत , भरकटलेल्या राजकारणाबाबत , बेरोजगारी तसेच सर्व वर्तमानातील समस्येवर येथील युनिव्हर्सल इंग्लीश मेडियम स्कुल सभागृहात झालेल्या ‘ गझल – कवि ‘ संम्मेलनात कविंनी सादर केलेल्या गझलेला उमरखेडकरांनी भरभरून दाद दिली . ‘ टिचभर पोटासाठी काय काय करता राव , अन म्हणत मग म्हणल म्हणता ‘ या डॉ जगदीश कदम यांच्या कवितेतून राजकारणाची घसरलेली पातळी वेगळ्या ढंगाने मांडली . तर नवोदीत कवी गजानन कवाणे म्हणतो, एवढा भाग्यवान क्रिकेटर , विकल्या जातो कोटीच्या बोलीवर, दिसत नसेल का शेतकरी त्यांना , ताटा मध्यला रोटीवर ‘ हजारो प्रेक्षकांच्या उपस्थीतीत् हे कवि संमेलन रंगत गेले .

उमरखेड तालूका दैनिक पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘ गझल – कवि ‘ सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील प्रख्यात गझल – जेष्ठ कवि प्रा . रविंद्रचंद्र हडसणकर , प्रा . डॉ . जगदीश कदम , प्रा . विलास भवरे, प्रा . डॉ . रवि चापके, श्रीनिवास मस्के, गजानन वाघमारे, सुरेश धनवे , गजानन कवाणे , , शेख गनी यांनी एक से एक गजला सादर करून या संम्मेलनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
आम्ही लढु नव्याने ! मरणास झुंज देवु !
झेपुनी वार सारे आम्ही जिवंत राहु !
या प्रा . विलास भवरे यांच्या दंवडी कवितेच्या ओळीने वर्तमानात बेरोजगार तरुणांची व्यथा मांडली . .

झुंबराचे वार झाले !
दोन योद्धे ठार झाले !
आठवण लागे जिव्हारी !
घाव हिरवेगार झाले !
तसेच,
मतलबी धोरणासारखा पाहिजे !
देश त्यांना मनासारखा पाहिजे !
आतल्याआत नंगा तमाशा करा !
चेहरा किर्तनासारखा पाहिजे !
या गजानन वाघमारे यांच्या गझलेला तरुण प्रेक्षकांनी दाद दिली .

लाखात पाहिला मी शिस्तीतला शिवाजी !
फेकुन मौन मारी , संतापला शिवाजी !
त्यांना शुगर निघे , जे सम्राट साखरेचे !
आपण कधी तपासू , रक्तातला शिवाजी !

या रविप्रकाश चापकेच्या कवितेने खऱ्या अर्थाने हा गझल – कवि सम्मेलन शिवाजी महाराज जयंती निमीत्य साजरा केला . यालाही भरभरून श्रोत्यांनी दाद दिली .
यावेळी ठेसनात गाडी घुसली ! या रविचंद्र हडसणकर यांच्या गझलेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
एकंदरीत उमरखेडशहर वासीयांसाठी गझल कवि संम्मेलनाच्या माध्यमातून साहित्याची मेजवाणी उपलब्ध झाली .
या गझलकवि सम्मेलनाचे उद्घाटन आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी जेष्ठ विधि तज्ञ अॅड. संतोष जैन हे होते . विशेष अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ . विजय माने , आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर,  माजी नगरअध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, भाजपा जिल्हासचिव महेश काळेश्वरकर , गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड ,  अध्यक्ष डॉ . अविनाश खंदारे यांची उपस्थिती होती .
या कवि सम्मेलनात तारकेश्वरी विवेक मुडे , इनरव्हिल क्लब , रोटरी क्लब , पुरोगामी युवा ब्रिगेड , जीजाऊ ब्रिगेड , प्रा . ज्योती काळबांडे , औंदुबर वृक्ष संवर्धन
समीती , प्रा . आकांक्षा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ . अनिल काळबांडे यांनी केले. संचलन शाहरुख पठाण यांनी तर आभार डॉ . अविनाश खंदारे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय देशमुख , संतोष कलाणे , राजेश गांजेगावकर ,भिमराव नगारे, राजु गायकवाड , दत्ता काळे, अशोक गांजेगावकर , विजय आडे , सर्जेराव पाटील , संतोष मुडे यांनी परिश्रम घेतले .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “बाईपणाच जगण , विस्तवाशी सोयरपण  उन्हातल्या जिंदगीला सावलीच परकेपण – श्रीनिवास मस्के..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!