उमरखेड मध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात, एका विद्यार्थिनीचा मृत्यू. मृत विद्यार्थिनी आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

youtube

उमरखेड मध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात, एका विद्यार्थिनीचा मृत्यू.
मृत विद्यार्थिनी आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

प्रतिनिधी/उमरखेड
उमरखेड येथील एका खासगी स्कूलच्या बसला शनिवारी सकाळी पळशी फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात नवव्या वर्गातील एक विद्यार्थीनी ठार झाली. महिमा आप्पाराव सरकाटे (१५), रा.दिवटी पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघातात स्कूल बस मधील इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस असल्याचे समोर आले आहे. उमरखेड तालुक्यातील कुपटी ते दहागाव दरम्यान ही दुर्घटना घडली. शाळेची ही बस उमरखेडच्या दिवटीपिंपरी वरून दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. मात्र अचानक स्कूलबसच्या स्टिअरिंग रॉड तुटला आणि नियंत्रण गमावून बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली .
बस झाडावर जोरात आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी झालेत . त्यापैकी महिमा आप्पाराव सरकटे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ती दिवटीपिंपरी येथील रहवासी असून इयत्ता 9वी मध्ये शिकत होती. इतर काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड मध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात, एका विद्यार्थिनीचा मृत्यू. मृत विद्यार्थिनी आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

  1. Your blog is a shining example of excellence in content creation. I’m continually impressed by the depth of your knowledge and the clarity of your writing. Thank you for all that you do..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!