पोफाळी पोलीस स्टेशनची कारवाई १५ लाखाचा प्रतिबंधित गुटख्या सहीत वाहन पकडले
पोफाळी पोलीस स्टेशनची कारवाई
१५ लाखाचा प्रतिबंधित गुटख्या सहीत वाहन पकडले
उमरखेड प्रतिनिधी :- पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना मिळालेल्या गोपनिय माहीती आधारे दि. २४/०६/२०२४ रोजी चे मध्यरात्री ०१.०० वा. एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन क. एम.एच. २६-सी.एच. ०२६४ हे शासन प्रतिबंधीत गुटखा माल अवैधरित्या घेवुन जात आहे.
या गोपनिय खबरेवरुन पोलीस स्टेशन पोफाळी चे ठाणेदार व त्यांच्या पथकाने उमरखेड पुसद रोडवर गंगणमाळ फाटयावर सापळा लावला असता एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेड वरुन पुसद च्या दिशेने येतांना दिसली. सदर वाहनास हात दाखवुन थांबविले असता वाहन दूरच थांबले व वाहनातील चालक पोलीसांना पाहुन वाहन जागेवरच सोडुन पोबारा झाला. पोलीसांनी दोन प्रतिष्ठीत पंच बोलावुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामधे शासन प्रतिबंधीत केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुददेमाल दिसुन आला. सदर मालाची मोजनी केली असता मोठे पांढरे रंगाचे 10 कट्टे ज्याचे आतमध्ये विमल कंपनिचे 2600 पॉकीट प्रत्येकी अं. किंमत 400/- रुपये प्रमाणे 10,40,000/- रुपये चा मुद्देमाल.मोठे खाकी रंगाचे 02 कट्टे ज्याचे आतमध्ये विमल कंपनिचे 440 पॉकीट प्रत्येकी अं. किंमत 450/- रुपये प्रमाणे 1,98,000/- रुपये चा मुद्देमाल.
मोठे पांढरे रंगाच 01 कट्टा ज्याचे आतमध्ये राजनिवास कंपनिचे 250 पॉकीट प्रत्येकी अं. किंमत 150/- रुपये प्रमाणे 37,500/- रुपये चा मुद्देमाल. मोठे खाकी रंगाचे 03 कट्टे ज्याचे आतमध्ये वि 1 कंपनिचे 1560 पॉकीट प्रत्येकी अं. किंमत 100/- रुपये प्रमाणे 1,56,000/- रुपये चा मुद्देमाल.मोठे खाकी रंगाचे 01 कट्टे ज्याचे आतमध्ये विमल ब्लॅक कंपनिचे 200 पॉकीट प्रत्येकी अं. किंमत 150/- रुपये प्रमाणे 30,000/- रुपये चा मुद्देमाल व
एक महिंद्रा कंपनिची बोलेरो गाडी ज्याचा वाहन क्र.एम.एच.26 सि.एच.0264 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- रुपये चा मुद्देमाल असा एकुण 20,61,500/- रु चा मुद्देमाल गाडीसह मिळुन आला.सदरचा मुददेमाल ताब्यात घेवुन आरोपी वाहन चालक नामे शेख अयाज शेख वहाब, वय ३५ वर्षे, रा. गढी वार्ड पुसद याचेविरुध्द पोस्टे पोफाळी येथे अप. क
१७०/२०२४ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल कोठुन आणला व त्याचा मुळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. पवन बनसोड साो., पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. . पियुष जगताप साो, अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ, मा. श्री. हनुमंत गायकवाड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. आधारसिंग सोनोने साो, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहा. पोलीस निरीक्षक पंकज व्ही दाभाडे ठाणेदार पोफाळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश बोंबले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे, महीला पोलीस कॉन्स्टेबल निलम श्रीनिवास यांनी पार पाडली.
Vitazen Keto I like the efforts you have put in this, regards for all the great content.
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up
Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job