उमरखेड नगरपरिषदेच्या अन्यायकारक जादा कर आकारणीस अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

youtube

उमरखेड नगरपरिषदेच्या अन्यायकारक जादा कर आकारणीस अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

 

आ.नामदेवराव ससाणे यांच्या मागणीस यश

उमरखेड प्रतिनिधी -/ उमरखेड नगरपरिषदेकडून काही महिन्यांपूर्वी अन्यायकारक जादा कर आकारणीस आ.नामदेवराव ससाणे यांचे मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून स्थगितीचे आदेश देण्यात आले आहे. दि.25 जून रोजी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.नामदेवराव ससाणे व भाजपा यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा यवतमाळ-वाशिम लोकसभा प्रभारी नितीन भुतडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमरखेड नगरपालिकेकडून आकारण्यात आलेली जादा कर आकारणी रद्द होण्याबाबत पत्र दिले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवास तात्काळ स्थगिती देऊन प्रकरण सादर करण्यासंदर्भात आदेशीत केल्याचे पत्र आ.ससाणे यांचेकडून प्रसिद्धी माध्यमाना देण्यात आले.
स्थानिक नगरपालिका प्रशासनाने जादा कर आकारणी करून नागरिकांना वेठीस धरले होते. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी ही केल्या होत्या.मात्र कर वाढीवर लगाम बसायला मार्ग नव्हता.
अवाढव्य पद्धतीने सुरू असलेल्या कर आकारणीबाबत नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी नगरपालिकेत स्थानिक अपील समिती अस्तित्वात नसतांनाही नगरपालिकेकडून जुन्या कर आकारणीवर कोणताच निर्णय न घेता त्याच कर आकारणीवर 25 ते 27 टक्के वाढीव पद्धतीने कर आकारणी करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम जाणवत होता. निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकीय काळामध्ये कर वाढीसंदर्भाने तक्रारदार नगरपालिका कार्यालयात नेहमीच वादविवादास सामोरे जातांना प्रशासनाची दमछाक अनेकांनी बघितली आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी अवघड समस्या ठरलेल्या कर वाढीवर आ.नामदेव ससाणे व नितीन भुतडा यांनी प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळविल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केल्या जात आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड नगरपरिषदेच्या अन्यायकारक जादा कर आकारणीस अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

  1. Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

  2. Just wish to say your article is as surprising The clearness in your post is just cool and i could assume youre an expert on this subject Fine with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please keep up the enjoyable work

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!