शीतल पाटील यांच्या आमरण उपोषणाला प्रशासनाच्या लेखी आश्वासनमुळे स्थगिती हदगाव.

youtube

शीतल पाटील यांच्या आमरण उपोषणाला प्रशासनाच्या दिलेल्या लेखीआश्वासनामुळे स्थगिती

हदगाव…
अनेक दिवसापासून हदगाव तालुक्यातील तामसा येथील सरकारी राशन गोडाऊन बद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाले होते. त्या गोडाऊन चा स्टिंग ऑपरेशन करून धान्य विल्हेवाट लावणाऱ्या पर्दाफाश करणारे पत्रकार शीतल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालय व इतर कार्यालयांना तक्रार नोंदविली होत परंतु त्या तक्रारीची कोणत्याही कार्यालयाने दखल घेतली नसल्याने दिनांक 8/2/2022रोजी हदगाव तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात आले होते आमरण उपोषण सुरू असताना अनेक संघटनांनी शीतल पाटील पत्रकार यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा नोंदविला शेतकरी संघटने तर्फे प्रल्हाद सूर्यवंशी ,
मानव अधिकार कोषाध्यक्ष गणेशराव गंगाराम हामरे, पळसा यांच्या तर्फे सुद्धा पाठिंबा देण्यात आला. शामराव चव्हाण, बबनराव कदम, सुदर्शन पाटील असे अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा नोंदविला होता वाढत्या पाठिंब्यामुळे प्रशासन जागी झाली आणि त्वरित पत्र तयार करून तीन दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेशित पत्र घेऊन पुरवठा विभागाचे चौधरी यांनी निवेदन शीतल पाटील यांना विश्वासात घेऊन पत्र देण्यात आले. शीतल पाटील यांनी लेखी आश्वासन सहित संबंधित मानकरी लोकांनी दिलेल्या हमी मुळे  उपोषणाला स्थगिती दिली. शीतल पाटील यांनी असे सांगितले जेणेकरून तीन दिवसात संबंधित गोडाऊन कीपर वर योग्य कार्यवाही न झाल्यास मी पुढेसुद्धा उपोषण करणार मी कोणत्याही गोष्टीला बळी न पडता गोरगरीब जनतेसाठी अखेरपर्यंत माझा लढा सुरू ठेवणार मला आलेल्या फोनच्या माध्यमातून धमक्या त्या धमक्या ला मी घाबरणार नाही असे धाडशी निर्णय घेत शीतल पाटील यांनी आपले उपोषण सोडले याप्रसंगी उपस्थित चौधरी , शामराव मामा ,बबन कदम ,पत्रकार पाशाभाई सुदर्शन पाटील, संदीप वानखेडे अनेक व्यक्ती उपस्थित होते. येत्या तीन दिवसानंतर यावर कोणती व कशी कार्यवाही होईल याकडे सामान्य जनतेचे लक्ष वेधुन आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!