शिवजन्मोत्सव समिती बोरी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट च्या खुल्या सामना चे डॉ.विजयराव माने व कृष्णा पाटील देवसरकर यांच्या हस्ते उद्घाटन.

youtube

*शिवजन्मोत्सव समिती बोरी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे डॉ. विजयराव माने , कृष्णा पाटील देवसरकर यांचे हस्ते उ्दघाटन*

उमरखेड /तालुका प्रतिनिधी :

तालुक्यातील बोरी या गावी श्री गोविंदराव पाटील स्टेडियम बोरी येथे आज दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजन्मोत्सव समिती बोरी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन डॉक्टर विजयराव माने व कृष्णा पाटील देवसरकर यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारोतराव माने, प्रमुख पाहुणे डॉक्टर विजयराव माने ,कृष्णा पाटील देवसरकर, रामराव माने, सुधाकर जी वानखेडे सर, गजानन माने सर, कुलदीप माने सर तसेच शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष पंजाबराव माने , माधव माने
पिंटू दुगाने तसेच गावातील व बाहेर गावची प्रेक्षक मंडळी उपस्थीत होती.
डॉ माने साहेब यांनी त्यांच्या भाषणातून क्रिकेट हा विकसित देशाचा खेळ मानला जातो असे प्रतिपादन केले. अमेरिका नव्याने स्थापन असलेलादेश क्रिकेट सारख्या वेळखाऊ खेळा मध्येफारसे लक्ष केंद्रित करत नाही युरोप हा जुना आणि विकसित देशाचे समूह असल्यामुळे समृद्धी आणि विकास भरपूर झालेला असल्यामुळे तिथे हा खेळ रुजला भारतासारख्या देशामध्ये क्रिकेट खेळामध्ये रुची वाढलेली आहे त्याच बरोबर ग्रामीण भागामध्ये हा खेळ फार आवडीने खेळला जातो भारत सारख्या विकसशील देशामध्ये बोरी या ग्रामीण भागामध्ये अतिशय मर्यादित जागेत 8 ते 10 और चे सामने बोरी तील शिवजन्मोत्सव समितीने बोरी तील युवकाने ठेवून वेळेचे नियोजन केल्याबद्दल त्यांचे डॉक्टर माने साहेबांनीकौतुक केले त्याच सोबत कोणताही खेळ मनाची एकाग्रता वाढावी आणि खेळातून सकारात्मक रुची स्पोर्ट मॅन स्पीड निर्माण हावी जेणेकरून नवयुकांमध्ये चेतना जागृत होऊन त्याचा उपयोग आवश्यक असलेल्या व्यवसाय आणि स्वय रोजगार मध्ये व्हावा अशा शुभ कामना व्यक्त केल्या
त्यानंतर कृष्णा पाटील देवसरकर यांनी आपल्या वाणीतून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या त्यानंतर कार्यक्रमाचे आभार माधव माने तर
सूत्रसंचालन विनोद माने यांनी केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!