कृषी उत्पन्न बाजार समिती पावणेदोन कोटीने नफ्यात चार वर्षाचा आढावा सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून मांडला.

youtube

कृषी उत्पन्न बाजार समिती पावणेदोन कोटीने नफ्यात

चार वर्षाचा आढावा सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून मांडला

उमरखेड :- चार वर्षापूर्वी सत्ता हातात घेताना 34 लाख रुपये शिल्लक असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आज पावणेदोन कोटी रुपयांनी नफ्यात असल्याची बाब आयोजित पत्रकार परिषदेमधून सभापती बाळासाहेब चंद्र यांनी चार वर्षाचा आढावा देताना पत्रकारासमोर मांडली.
मागील चार वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर फक्त 34 लाख रुपये शिल्लक होते त्यानंतर या 34 लाखावरही मागील सन 2018 ला झालेला निवडणूक खर्च देखील याच संचालक मंडळाच्या माथ्यावर मारला गेला असा अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाय मुख्य यार्ड उमरखेड, उपबाजार उमरखेड, ढाणकी आणि साखरा या ठिकाणी विविध विकास कामे करून 40 दुकान गाळे माध्यमातून लाखो रुपयांच्या विकास कामाचा आढावा देखील त्यांनी यावेळी दिला यामध्ये शेतकरी निवास , गोदाम , भुकाटे, प्रसाधनगृह , पाणीपुरवठा , सीसीटीव्ही तिथे रस्ते बांधकाम अशा अनेक सुविधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकर्त्यासाठी भव्य दालन उभं केल्याचे माहिती त्यांनी यावेळी दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे शेतकऱ्यांना धारण धान्य तारण कर्ज ही योजना शेतकऱ्याने धान्य दिल्यानंतर पुण्यावरून त्याचा त्याची कर्ज मंजुरात घ्यावी लागते यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागायचा परंतु सदर संचालक मंडळांनी ही योजना बाजार समितीच्या स्वनिधीतून सुरू करून शेतकऱ्यांना तात्काळ धान्य तारण कर्ज उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाय दुकान गाळ्याची ठेवी आणि भाडे या माध्यमातून इतरही कामे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले ज्यामध्ये मुख्य इमारतीची उपबाजार मध्ये दहा गाळे बांधकाम अशा अनेक बाबी त्यांनी पत्र परिषदेतून मांडल्या सध्या बाजार समितीमध्ये 26 कामगारांची मान्यता असून फक्त आठ कामगार कर्तव्यावर आहेत कामाचा बोजा पाहता नऊ कामगार पदभरती ही आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या नजरेत आणून मंजुरात देखील मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ज्यामुळे कामे होण्यास सुखकर सुकर होईल परंतु विशेष बाब म्हणजे ह्या पदभरती मध्ये उमरखेड तालुक्यातील शेतकरी पुत्रांना भूमिपुत्रांनाच प्राधान्य देण्यात असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले जागतिक महामारी ठरलेल्या दोन वर्षाचा कोरोना काळ त्यानंतर जनावरांवर आलेल्या लंबी रोगाचा आजार या सात रोगामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर बराच फरक पडला असून असला तरी देखील बाजार समिती आज रोजी फायद्यातच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पत्र परिषदेत माहिती देताना सभापती बाळासाहेब चंद्रे यांचे समवेत मंचक चव्हाण , बाळासाहेब नाईक, अजय नाईक , सुनील गव्हाळे , शामराव वानखेडे, सुदर्शन ठाकरे , जयनारायण नरवाडे, गजानन बोसले , दत्तराव रावते , अविनाश जाधव , रघुराम बेले, दिलीप जाधव, विनय कोडगिरवार , अजमल खान , संदीप जाधव यांचे समवेत सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Box
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेट्रोल पंप प्रस्तावित ..
शहरालगत असणाऱ्या उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरविण्यात येणाऱ्या गुरांच्या बाजाराच्या आवारामध्ये पेट्रोल पंप प्रस्तावित आहे. ज्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये आणखी भर पडणार असल्याचे असून लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळेल अशा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Google Ad
Google Ad

1 thought on “कृषी उत्पन्न बाजार समिती पावणेदोन कोटीने नफ्यात चार वर्षाचा आढावा सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!