अमृतेश्वर महादेव संस्थान हरदडा येथे पवित्र श्रावण मासा निमीत्त अखंड शिवनाम पारायण उत्साहात सुरु उमरखेड –
अमृतेश्वर महादेव संस्थान हरदडा येथे पवित्र श्रावण मासा निमीत्त अखंड शिवनाम पारायण उत्साहात सुरु
उमरखेड –
उमरखेड तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले हरदडा येथील अत्यंत जागृत असे व भक्ताला पावणारे अमृतेश्वर महादेव मंदिरात पिंपळगांव (दत्त) येथील श्री. श्री. श्री. बालयोगी महंत व्यंकटस्वामी महाराज यांनी श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी बैठक घेऊन श्रावण महिण्याच्या
पहिल्या दिवसापासुन पोळा या सणाच्या करीपर्यंत अखंड शिवनाम पारायण, नामस्मरण, अखंड
ओम नमः शिवाय जप करण्याची आज्ञा केली. त्या अनुषंगाने हरदडा येथील अमृतेश्वर महादेव
मंदिरात अखंड शिवनाम पारायण, नामस्मरण सोहळा भक्तीभावपुर्ण वातावरणात उत्साहात सुरु
झाला आहे. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.हरदडा येथे उमरखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील भजनी मंडळाच्या व गावकऱ्यांच्या माध्यमातून ईश्वर चिंतन केल्या जात असल्यामुळे भाविक भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले
आहे. अमृतेश्वर संस्थान तर्फे महिनाभर भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरु करण्यात आले असुन
दोनवेळेस जेवण व चहापाणी दिल्या जात आहे. श्रावण महिण्यामध्ये ईश्वर चिंतन करुन पुण्य
वाढविण्यासाठी अनेक गावच्या तारखा बुक झाल्या असुन तालुक्यातील भजनी मंडळ व गावकऱ्यांनी
आपल्या गावची नामजपाची तारीख व वेळ घेण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन उमरखेड
विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा अमृतेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रकाश
पाटील देवसरकर यांनी केले आहे.
व सध्या कलयुग सुरु असुन अधर्म व पापाचार वाढत आहे. तालुक्यातील गावकऱ्यांनी पुण्य
संचय करण्यासाठी व समाजात चांगले परिवर्तन घडुन आणण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे
आवश्यक असुन संस्थानात अखंडपणे ओम नमः शिवाय हा नाम जप सुरु करण्यात आला आहे.
या नामस्मरणाची सांगता पोळयाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी महाप्रसादाने मोठया
स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी आपआपल्या परिने
जेवढे शक्य होईल असे धान्य तांदुळ, डाळ, व अन्य शिधा संस्थानकडे स्वच्छ व साफ निवडुन जमा करावा असे आवाहनही यावेळी मा.जि आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले आहे.
Wow, this paragraph iis pleasant, myy younber siter iss analyzing these kjnds off things, thjs I amm going tto lett know her.