सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे उमरखेड शहराच्या शांततेला गालबोट – जमावाकडुन दुकानांची व वाहनाची ठिकठिकाणी

youtube

सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे उमरखेड शहराच्या शांततेला गालबोट जमावाकडून दुकानांची व वाहनांची ठिकठिकाणी तोडफोड.तोडफोड.

प्रतिनिधी / १८ डिसेंबर
उमरखेड –
शहरात १७ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एका धर्मा बद्दल अपप्रचार असणारा व्हिडिओ अपलोड केल्याने संतापाची लाट उसळली त्यानंतर शेकडो संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनला धडक दिली नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर घरी परतत असताना संतप्त जमावाने शहरातील अनेक गाड्यांची तोडफोड केली तर नाग चौक स्थित एका ऑटोमोबाइल्स ला आग लावण्यात आली शिवाय एक हेअर सलून फोडण्यात आल्याची घटना घडली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे
सविस्तर वृत्त असे की १७ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान तीन युवकांनी इंस्टाग्राम ॲप वर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शी अर्थात लाईव्ह येऊन एका समाजा बद्दल आक्षेपार्ह विधान करत पोस्ट प्रसिद्ध केला काही क्षणातच सदर  व्हायरल झाल्याने संबंधित समाजाच्या भावना अनावर झाल्या यावर त्या समाजाच्या युवकांनी पोलीस स्टेशन गाठले परंतु पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर ही बराच वेळ आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपी शोधण्यामध्ये लागत असल्यामुळे सायंकाळच्या दरम्यान पुन्हा जमाव पोलीस स्टेशन कडे गेला यावर पोलीस स्टेशन मधून परतत असताना रस्त्यातील शेकडो वाहनांची काचा फोडून नासधूस केली सोबतच नाग चौक स्थित भराडे यांचे गणेश ऑटोमोबाईल्स जाळण्यात आले तर नरवाडे यांचे प्रेरणा हेअर सलून याची तोडफोड करण्यात आली यावर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तीन विविध गुन्हे दाखल करण्यात आले सर्वप्रथम व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या तीन युवकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर दुकान जाळपोळ प्रकरणी आणि गाड्यांची तोडफोड प्रकरण अशा तीन विविध गुन्ह्यांवर विविध कलमान्वये अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सद्यस्थितीत वृत्त लिहीपर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे सदर घटनेमध्ये आठ चारचाकी वाहन ,दोन तिनचाकी अॅटो तर दहा दुचाकी वाहनांची तोडफोड झाली असल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून तनावपूर्ण शांतता आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले असले तरीही व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद केल्याने शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. सदर घटनेनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आमदार नामदेव ससाने यांच्या सह अन्य पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनां तसेच शांतता समितीचे सदस्य पदाधिकारी हे नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत रात्रभर फिरले असून सकाळपासून अफवांना बळी पडू नका अफवांवर विश्वास ठेवू नका नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन करत आहे
सदर घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ , सहाय्यक पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी उमरखेड चे पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांचे सह जिल्ह्यातील सर्व अधिकारी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत्र आमदार – संजय राठोड

काळी दौलत खान येथील घडलेल्या घटनेनंतर उमरखेड शहरांमध्ये मतांचे तुष्टीकरण करण्याकरता दोन समुदायांमध्ये भांडण लावून वातावरण बिघडविण्याचे कार्य करण्यात येत आहे महा विकास आघाडीच्या विकासात्मक वाटचालीला बदनाम करण्याचे षडयंत्र असून या घटनेमागील आणी या घटनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या कुठल्याही दोषींची गय केल्या जाऊ नये , शिवाय या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करण्यात यावी असे पोलिसांना निर्देश देण्यात आले असल्याचे माजी पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले .

व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने बंद

कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये व्यापाऱ्यांनाच लक्ष केल्या जाते १७ डिसेंबर रोजी देखील घडलेल्या घटनेत देखील व्यापाऱ्यांनाच लक्ष करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ आज १८ डिसेंबर रोजी व्यापारांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बाजारपेठ बंद केली असून सदर व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रशासनाला निवेदन दिले या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही
– एस पी डॉ . दिलीप भुजबळ
झालेल्या घटनेमध्ये दोन्ही परस्पर विरोधी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष घडलेला नसून इन्स्ट्रा ग्राम वर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह व जातिय तणाव निर्माण करणारी पोस्ट व्हायरल झाल्याने संतप्त झालेल्या एका समुदायाने पोलीस स्टेशन समोर १५० ते २०० लोकांनी एकत्रित येऊन हिंदू बहुल वस्तीमध्ये जाऊन दुकाने दुचाकी , चारचाकी वाहनांची तोडफोड करून संपत्तीचे नुकसान केले . व नांदेड रोडवरील सुनिलभराडे यांच्या मालकीचे अँटो मोबाईलचे दुकान जाळले . या घटनेमधील ७ जणांना पोलीसांनी अटक केली आहे . यात १७ आरोपीची नावे निष्पन्न झाले होते . उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ . आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राजकिय पक्ष अशा घटनाना खतपाणी घालुन शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे . यामध्ये वेग वेगळ्या तीन घटनेच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे . या घटनांमागील आरोपींवर कठोर कार्यवाही करून शहरात शांतता नांदण्यासाठी योग्य ती उपाय योजना करू तसेच नागरीकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन डॉ . स.पि भुजबळ यांनी केले .

Google Ad
Google Ad

1 thought on “सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे उमरखेड शहराच्या शांततेला गालबोट – जमावाकडुन दुकानांची व वाहनाची ठिकठिकाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!