उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य भाजपात दाखल उमरखेड :
उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य भाजपात दाखल !
उमरखेड :
आज उमरखेड येथे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या निवासस्थानी भाजपा पक्षाच्या कामगीरीने प्रभावीत होवुन तालूक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसहीत तंटामुक्त समीती अध्यक्षांचा पक्षप्रवेश भाजपा मध्ये झाला. यासाठी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे,माजी आमदार नामदेवराव ससाने,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली पार पडला.
या प्रवेशात तालुक्यातील बोथा गावचे सरपंच गणेश राठोड, चिल्ली गावचे सरपंच बळीराम राठोड, वरुडबीबी गावचे सरपंच तुकाराम राठोड,डिंडाळा गावचे सरपंच कैलास राठोड,बोथा गावचे उपसरपंच सवाईराम आडे, चिल्ली गावचे उपसरपंच सुरेश राठोड, दिंडाळा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमरसिंग जाधव,बोथा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी शेरे, श्री फकीरा चव्हाण ( ग्रा.प.सं.बोथा),आत्माराम राठोड, अंकुश पवार ( ग्रा.प.स.चिल्ली ), बबन जाधव ( ग्रा.प.स.चिल्ली ), संतोष आडे ( ग्रा.प.स.चिल्ली ), सुनील जाधव ( ग्रा.प.स.चिल्ली ), गणेश आडे ( ग्रा.प.स.चिल्ली ), गोपीचंद जाधव ( ग्रा.प.स.चिल्ली ), विठ्ठल जाधव ( ग्रा.प.स.दिडांळा ) यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश पार पडला.
या कार्यक्रमाला उमरखेड ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष विठ्ठल वानखेडे,ढाणकी ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम राठोड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते,जिन प्रेसचे उपाध्यक्ष जितु पवार,कृ.उ.बा.स.उपसभापती श्रीपाल आडे,माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत,महागाव नगरपंचायतीचे माजी नगर उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे, सुकळी अगावचे सरपंच शिवाजी पाटील रावते,कृ.उ.बा.स.संचालक गजानन देवसरकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परमानंद पाटील कदम, विवेकानंद पाटील नलावडे, योगेश पाटील वानखेडे, विकास राठोड, धनराज पाटील, बबन जाधव इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



