निवडणूकीचा बाजार ; दहीहंडीचा आधार? 【हिंदू सणांचा सन्मान करा,अवमान नको!】 – सिद्धेश्वर दहीहंडी मित्र मंडळाचा पत्रकार परिषेदेत आरोप !

youtube

निवडणूकीचा बाजार ; दहीहंडीचा आधार?

【हिंदू सणांचा सन्मान करा,अवमान नको!】
– सिद्धेश्वर दहीहंडी मित्र मंडळाचा पत्रकार परिषेदेत आरोप !

उमरखेड :

शहरात मागील ७५ वर्षापासुन परंपरागतपणे सिध्देश्वर मित्र मंडळाच्या वतीने पारंपारीकपणे, मानाचा दहीहंडी उत्सव साजरा करीत आहोत . नितिन भाऊ भुतडा मित्र मंडळ परिवार आयोजीत १० सप्टेंबरची दहीहांडी ही राजकीय असुन आमचा पारंपारीक अधिकार हिरावुन घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये . ३१ ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर दहीहंडी मित्र मंडळाच्या वतीने उमरखेड येथे स्थानिक बाजार समिती मध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत १० सस्टेबर रोजी होणाऱ्या दहीहांडी महोत्सवाला अनुसरून पत्रपरिषदेत आरोप करीत म्हटले आहे .
आमच्या मंडाळाची दहीहंडी ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिल नसुन सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने तब्बल ७५ वर्षांपासुन पारंपारीक आणि ऐतिहासिक पद्धतीने समन्वय ठेऊन दहीहंडी उत्सव साजरा करीत आहो असे मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी सिध्देश्वर जगताप यांनी विशेष उल्लेख करत म्हटले आहे .
तालुक्यातील पळशी , संगम चिंचोली पुरबाधित गावाला सन २००६ मध्ये निर्माण झालेल्या पुर परीस्थीतीला मानवतेचा दुष्टीकोण ठेऊन मदत केली . कोल्हापुर येथे महापुर आला होता तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधिस मंडळाच्या वतीने १ लाख मदत केली .तसेच दिव्यांग मुलीनां शिक्षणासाठी आणि आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवानां मदत करून अनेक सामाजिक उपक्रम राबविले असे त्यांनी सांगितले .
यावेळी सिद्धेश्वर जगताप, सनी गायकवाड, तुलसिराम चोरघडे, करण रुडे, प्रशांन्त कदम, सुनील चोरघडे, सचिन जगताप, अनिल ठाकरे, गणेश ठाकरे, अजय नरवाडे, विशाल धुळे, आकाश जैवे, संकेत गाडगे, शिवम चोरघडे, मनोज बेहरे, अंकुश खाडे ,प्रमोद कदम आदि उपस्थीत होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!