मराठा आंदोलकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
मराठा आंदोलकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
उमरखेड : –
जालना येथे सराठी या भागात मराठा आरक्षण मागणी करणाऱ्या आंदोलकावर येथील पोलीसानी हवेत गोळीबार करून अश्रूध्रुवाचा वापर करीत महिला , लहान मुले वृद्धांना घेरुण मोठ्या प्रमाणात मारहाण केली राज्य सरकारने अमानुष वागणुक दिली या दडपशाही सरकारचा निषेध म्हणुन मराठा आरक्षणाला पाठींबादेत आज शनिवारी दिनी दुपारी बारा वाजता स्थानिक संजय गांधी चौकात आक्रमक झालेल्या समाज बांधवानी एकीचे बळ दाखवून अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले या अंदोलनात शेकडोच्या वर समाज बांधवानी तालुक्यातुन सहभाग घेतला होता.
आरक्षण रणनिती संदर्भात उदया रविवारी उमरखेड शहरात आरक्षण मिळविण्यासाठी या प्रमुख मुद्यावर सर्कल मराठा बांधवाची महत्वाची बैठक होणार असल्याची माहीती यावेळी चकका जाम आंदोलन स्थळी जाहीर केले .
जालना अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण मागणी करणार्या समाज बांधवावर अमानुषपणे गृहमंत्री देवेद्र फडणवीसाच्या पोलीसांनी चिरडले याचा हिशोब सरकारला दयावा लागेल असे म्हणत उमरखेड मध्ये रास्ता रोको आंदोलन करतेवेळी आंदोलकांनी यावेळी म्हटले आहे जालना येथील लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये महिला वृध्द अनेकजण दगड फेक झाल्याने रक्त बंबाळ झालेत सरकारचा निषेध म्हणुन हा रास्ता रोको करण्यात आला अंदोलनाला सरोज देशमुख , सविता कदम वर्षा देवसरकर, संगीता वानखेडे , गजानन चव्हाण , स्वप्नील कनवाळे , बालाजी वानखेडे , संजय बिजोरे , दतराव शिंन्दे , भिमराव चंद्रवंशी , संदीप घाडगे , अरविंद भोयर , संतोष जाधव ,बालाजी वानखेडे , पवन सुर्यवंशी , अरविंद धबडगे , अमोल पंतिगराव , सुदर्शन ठाकरे , गजानन देशमुख , संभा जामगडे , दिपक झामरे, पपू कनवाळे , कैलास कदम , प्रकाश जाधव , अभय पवार , सुभाष जाधव , यांच्या सह शेकडोवर अनेक जनांनी सहभाग घेतला होता यानंतर दंगल नियत्रंण पथकाच्या वाहनातुन पो स्टे ला नेण्यात आले .