अमृत महोत्सव केंद्र शासन पुरस्कृत भव्य आरोग्य शिबिर संपन्न उत्तरवार उपजिल्हा रुग्णालय येथे
अमृत महोत्सव केंद्र शासन पुरस्कृत भव्य आरोग्य शिबीर संपन्न उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयात
[ तज्ञ डॉ.कडुन रुग्णांच्या मोफत तपासणी करून औषधी वाटप ]
उमरखेड ..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र शासन पुरस्कृत भव्य तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन आर पी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत येथे करण्यात आले .
तालुक्यातील जनते करिता शुक्रवार दि .22 एफ्रील रोजी विविध आजाराचे निदानावर उपचार व मोफत तपासणी करून औषधी वाटप तसेच “डिजिटल हेल्थ आयडी कार्ड, आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आले . आरोग्य शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ही रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले तर प्रमुख उपस्थीती रग्णकल्याण समिती सदस्य मधूसुदन उत्तरवार यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर आयोजित करण्यात होते असे प्रमुख उपस्थिती डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला, डॉ . आर .डी . राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ,डॉ. पी एस चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, येथील गटविकास अधिकारी प.स. उमरखेड तथा समिती अध्यक्ष प्रवीणकुमार वानखेडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश मांडण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धम्मपाल मुनेश्वर,नोडल अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी रुग्णास व लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले .
या आरोग्य मेळाव्यात विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर उपलब्द्ध होते .
डॉ . राम नाईक अस्थिरोगतज्ञ, डॉ .के बी राठोड जनरल फिजिशियन, डॉ .दारमवार मॅडम स्त्रीरोग तज्ञ, डॉ . आकमेवार फिजिशियन सर्जन,डॉ वीरखडे बालरोग तज्ञ, डॉ. देवसरकर बालरोग तज्ञ ,डॉ उगले दंत विकार तज्ञ, श्री .गारुळे ,हाके, नगराळे नेत्रतज्ञ,डॉ .जाधव मानसोपचार तज्ञ, डॉ जाधव मॅडम त्वचारोग तज्ञ तसेच विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आले तसेच इतरही विविध आजाराचे निदान व उपचार करण्यात आले तसेच
वृत्तलिखाना पर्यंत 850 रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती या आरोग्य मेळाव्यात हजारोच्या संख्येने रुग्ण उपस्थीत होते या आरोग्य शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विनय चव्हाण आणि प्रास्तविक नोडल अधिकारी डॉ जब्बार पठाण यांनी केले व आभार प्रदर्शन वैशाली घोंगडे मॅडम यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका उमरखेड, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी ,आयुष् वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी तालुका उमरखेड यांनी परिश्रम घेतले .
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.