उपोषण मंडप स्थळी दाखल होऊन विषारी औषध प्राशन करून समाजातील एका जनाचा जीवन संपविन्याचा प्रयत्न – आंदोलनाची तिव्रता वाढली. प्रशासनाची गांभीर्य पुर्वक धावपळ.
उपोषण मंडप स्थळी दाखल होऊन विषारी औषध प्राशन करून समाजातील एका जनाचा जीवन संपविन्याचा प्रयत्न – आंदोलनाची तिव्रता वाढली.
प्रशासनाची गांभीर्य पुर्वक धावपळ
उमरखेड –
मागील ५ सप्टेंबर पासुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उमरखेड तहसिल प्रागंणात पाच जनांचे बेमुदत उपोषण सुरु असतांना दुपारी १ : १५ च्या सुमारास मंडपात येऊन समर्थन दर्शवित जेवली गांवातील मराठा समाज बांधव अशोक देवराव जाधव ( ३५ ) ता उमरखेड यांनी कोराजेन हे विषारी औषध प्राशन केले जीवन संपविन्याचा प्रयत्न झाला लगेचच जवळ असलेले वैद्यकीय कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी प्रसांवधान ओळखुन तत्काळ वैद्यकीय विभागाच्या रुग्णवाहिके ने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केले मृत्यूशी झुंज देत असलेल्या मराठा समाजातील अशोक जाधव ( ३ ५ ) यांच्यावर डॉ रमेश मांडन व त्यांची सर्व टिम यांनी शर्थीचे प्रयत्न केले यावेळी डि वाय एस पी प्रदीप पाडवी , ठाणेदार शंकर पाचाळ , उप निरिक्षक सतिष खेडकर हे सर्व जन रुग्णालयात दाखल झाले होते अशोक जाधव यांना या ठिकाणावरून पुढील उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविन्यात आले आहे उमरखेड आंदोलन अधिकाधिक तिव्रते कडे वाटचाल करित असुन आज १ २ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नागापुर , कुपटी , देवसरी कारखेड , उंचवडद , दिवट प्रींपी , वानेगांव (पार्डी ) , सुकळी ( ज ) , अंबाळी येथील गांवातील समाज बांधवांनी मोर्चे काढले होते तर मुळावा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला रोज हजारो समाज बांधव आरक्षण समर्थनार्थ पाठींबा दर्शवित आहेत आरक्षण आंदोलन लढा सुरु असतांना या विष प्राशन करुन आत्महत्या करन्याचा प्रयत्न हि घटना झाल्याने प्रशासनाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली आहे
———–
सोबत –
फोटो जोडले