ट्रॅव्हल्स च्या धडकेने महिला जागीच ठार महागाव रोडवरील महाकाली धाब्या जवळील घटना.

youtube

ट्रॅव्हल्स च्या धडकेने महिला जागीच ठार

महागाव रोडवरील महाकाली धाब्या जवळील घटना

उमरखेड : –
नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव रोडवरील महाकाली धाब्याजवळ उमरखेडवरून यवतमाळकडे जाणाऱ्या प्रवाशी ट्रॅव्हल्स वाहनाची धडक लागून वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजताचे दरम्यान घडली आहे .
अंजनाबाई नथ्थुजी कांबळे वय अंदाजे 55 वर्षे ही वृद्ध महिला महाकाली धाब्यावर कामाला जात असतांना रस्ता ओलांडत असता उमरखेडवरून यवतमाळ कडे जाणाऱ्या खासगी प्रवाशी वाहतुकीच्या mh 29 BE 5495 क्रमांकाच्या धनेश्वर या वाहनाची जोरात धडक लागल्याने ती जागीच ठार झाली . असे प्रत्यक्षदर्शीनी पोलीसांना सांगीतले . पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचुन महिलेचा मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उत्तरवार शासकिय रुग्णालयात हलविला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!