जिल्हा स्तरीय पार्वती कला प्रदर्शनी मुळे ग्रामीण रोजगाराला संजिवनी – प्रवीण वानखेडे गटविकास अधिकारी उमरखेड.

youtube

जिल्हा स्तरीय पार्वती कला प्रदर्शनी मुळे ग्रामीण रोजगाराला संजिवनी – प्रवीण वानखेडे गटविकास अधिकारी उमरखेड

उमरखेड

शितल सखी मंच च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना गृह उद्योग बाबत प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांच्या कला गुणांना व्यवसायीक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महिलांनी बनविलेले आकर्षक आकाश कंदील,फुलदानी, परिक्षा साठी लागणारे पॅड, दीपावली साठी लागणारे सजावटीचे साहित्य, खाद्य पदार्थ,पापड,लोनचे ईत्यादी साहित्याची दिनांक १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ जिल्हास्तरीय पार्वती कला प्रदर्शनी व विक्री चे आयोजन राजस्थानी भवन वरचा हाॅल, महागाव रोड उमरखेड येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या प्रदर्शनी च्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड पंचायत समिती चे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी चे अध्यक्ष शामसुंदरजी लढ्ढा,पार्वती ग्रुप च्या अध्यक्ष रूपाली शिरडकर, राजस्थानी भवनचे अध्यक्ष मांगिलाल जांगीड, महात्मा बसवेश्वर सेवा समिती उमरखेड चे अध्यक्ष डॉ विष्णूकांत शिवणकर, महिला पत्रकार सविता चंद्रे, तर उपस्थितीत उमरखेड चे माजी आमदार विजयराव खडसे, इनायत जनाब, नंदकिशोर अग्रवाल, चितांगराव कदम,नितीन माहेश्वरी, प्रितीताई धामनकर, मांडवगडे , दिलीप भंडारे व सर्व दिपक ठाकरे, प्रकाश दुधेवार, विरेंद्र खंदारे, रमेश दिल्लेवार, बालाजी लढ्ढा,मान्यवर व महिला उपस्थित होत्या शितल सखी मंच च्या माध्यमातून ग्रामिण भागातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून, यामुळे ग्रामीण रोजगाराला नवसंजीवनी मिळाली असून शितल सखी मंच व पंचायत समिती उमरखेड च्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनी लवकरच आयोजित करण्यात येणार असून याकरिता जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे मत प्रविण वानखेडे यांनी व्यक्त केले. मुळावा प्रभागाची महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दिसुन आली याबद्दल प्रभाग प्रमुख माधुरीताई दळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी सर्व महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी, सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर व महिलांनी प्रदर्शनी ला भेट देवून विविध साहित्याची खरेदी केली. ग्रामीण रोजगाराला चालना देणे अतिशय आवश्यक आहे असे आवाहन चितांगराव कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बीचेवार, प्रास्ताविक बालाजी शिरडकर तर माधुरी दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास इंगोलकर, मयुर पुजारी, ऋषीकेश, ओंकार शिरडकर, अनुज लोखंडे, रमेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

1 thought on “जिल्हा स्तरीय पार्वती कला प्रदर्शनी मुळे ग्रामीण रोजगाराला संजिवनी – प्रवीण वानखेडे गटविकास अधिकारी उमरखेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!