अखेर वसंत कारखाणा भाडे तत्वावर १५ वर्षे :- भैरवनाथ कारखाना ऊस उत्पादक व कामगार यांना दिला , पाच तालुक्याच्या शेतकरी व कामगाराच्या चुली पेटणार. 

youtube

अखेर वसंत कारखाणा भाडे तत्वावर १५ वर्षे :- भैरवनाथ कारखाना
ऊस उत्पादक व कामगार यांना दिला , पाच तालुक्याच्या शेतकरी व कामगाराच्या चुली पेटणार
उमरखेड : –
विदर्भात अग्रेसर असणारा वसंत सहकारी साखर कारखाणा पोफाळी हा मागील पाच वर्षापासुन थकीत रक्कमे पायी बंद होता १२५ कोटी चे कर्ज कारखान्यावर असताना कारखाणा भाडे तत्वावर देण्यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगार यांनी शासणा कडे संघर्ष केला कारखाणा चालु करा कारखाणा विक्री काढू नका भाडेतत्वावर दयावा अशी मागणी वारंवार राज्यशासन यांच्याकडे ऊस उत्पादक व कामगार यांनी केली . जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅक यवतमाळ व प्राव्हीट फंड अकोला व कामगार यांची थकीत रककम असल्याने सर्वाच्या समन्वयातुन चर्चा वारंवार बैठका घेवून हा प्रश्न मार्गी लावला व नागपूर न्यायाल्य यांनी वसंत कारखाणा भाडेतत्वावर दयावा अशी हिरवी झेंडी दिली व सहकार आयुक्त पूणे यांणी कारखाणा १५ वर्षे देण्यासाठी निविदा काढली व नऊ कंपन्यानी निविदा भरली सात निविदा पात्र होत्या दोन अपात्र ठरल्या त्या मध्ये भैरवनाथ कारखाणा खा . हेमंत पाटील व ना . तानाजी सावंत यांच्या निविदेचा मंत्री मंडळाच्या समितीत बैठक झाली त्यामध्ये भैरवनाथ कारखाणा यांणा १५ वर्षे भाडेतत्वावर देण्यासाठी दिला आहे . मागील पाच वर्षा पासुन वसंत युनिट बंद होते आता वसंत कारखान्यांचे धुपट निघणार असल्याचे कळत आहे . वसंत कारखाणा भाडे तत्वावर देण्यासाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती व वसंत बचाव समिती यांणी वारंवार पाठपुरावा केला त्याच बरोबर उमरखेड चे आमदार नामदेव ससाणे भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा माजी आमदार विजय खडसे तातुजी देशमुख राम देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल , आत्माराव पाटील नागोराव पाटील गणेश घोडेकर बळवंतराव चव्हाण सुर्यकांत पंडीत, विलास चव्हाण पि के मुडे व्ही एम पंतगराव संतोष जाधव देवानंद मोरे बालाजी वानखेडे यांणी वसंत कारखाणा भाडे तत्त्वावर दयावा व कारखाणा सुरु व्हावा व खा . हेमंत पाटील व बॅकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे , शिवाजी राठोड यांनी मोलाची भुमीका बजावली आहे . भैरवनाथ कारखाणा यांना भाडे तत्वावर देण्यासाठी १५ वर्षे देण्याचे ठरले आहे तर वसंत कारखाणा १८ हजार सभासद व कामगार यांचा कारखाणा आहे या कारखान्यांचा धुर निघणार ऊस गाळप होणार असल्याचे वृत आहे .
प्रतिक्रिया :
वसंत कारखाणा कामधेनु जिवंत ठेवण्यासाठी ऊस उत्पादक व कामगार यांणा सहकार्य करण्यासाठी हा कारखाना १५ वर्षे भाडे तत्त्वावर देण्याकरीता शासण दरबारी सतत पाठपुरावा केला आता यश आले आहे
योगेश गोतरकर अवसायक वसंत कारखाना .
प्रतिक्रिया :-
वसंत कारखाणा लवकर व्हावा व ऊस उत्पादकांना विश्वासात घ्यावे व येणार्‍या हंगामात गाळप सुरू झाले पाहीजे ऊसाची लावगड भरपुर आहे . ऊस उत्पादक कारखान्याला सहकार्य करणार सर्वाच्या विचाराणे कारखाणा चालावा
आत्माराम पाटील वाटे गावकर ( ऊस उत्पादक संघर्ष समिती अध्यक्ष हदगाव .

Google Ad
Google Ad

1 thought on “अखेर वसंत कारखाणा भाडे तत्वावर १५ वर्षे :- भैरवनाथ कारखाना ऊस उत्पादक व कामगार यांना दिला , पाच तालुक्याच्या शेतकरी व कामगाराच्या चुली पेटणार. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!