भाऊसाहेब माने उत्कृष्ट महिला सशक्तीकरण पुरस्कार माधुरी दळवी यांना जाहीर
भाऊसाहेब माने उत्कृष्ट महिला सशक्तीकरण पुरस्कार माधुरी दळवी यांना जाहीर*
उमरखेड :
तालुक्यात आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीद्वारा आयोजित सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार जाहीर केल्या जातो . तालुक्यातील विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना करणाऱ्या 9 जणांना दि . 28 नोव्हेंबर रोजी येथील जिजाऊ भवन येथे पुरस्कार वितरण होणार आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने हे राहणार आहेत .
,स्वर्गीय रामचंद्र शिंगणकर व मरहुम हाजी अमानुल्ला जागीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला सशक्तिकरणाच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल माधुरी दळवी यांना,
या कार्यक्रम सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी , उपाध्यक्ष अविनाश पाटील चंद्रवंशी , सचिव बालाजी वानखेडे यांनी केले आहे .



