उमरखेड भीमजयंतीचा उत्साह; ‘जय भीम’च्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली
उमरखेड भीमजयंतीचा उत्साह; ‘जय भीम’च्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली
उमरखेड.
(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उमरखेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निळ्या पाखरांच्या मेळाव्यात आणि ‘जय भीम’च्या जयघोषात संपूर्ण औदुंबर नगरी दुमदुमून गेली होती. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या, ज्यात अबालवृद्धांसह महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
शहरातील मिरवणुकीची सुरुवात दोन मुख्य भागातून करण्यात आली:
सुमेधबोधी विहार (बोरबन) मार्ग येथून निघालेली मिरवणूक कृष्णमंदिर, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली. बँजो पथकाच्या तालावर आणि भीमगीतांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली.तर शहराचा मध्यभाग असलेल्या आंबेडकर वार्डातूनही भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही रॅली नाग चौक, बस स्टॅन्ड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली.
चौकट
महामानवाला अभिवादन
मिरवणुकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आला. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर निनादला होता.
चौकट :
समुदायाचा उदंड प्रतिसाद
या सोहळ्यात बहुजन समाजातील लहान मुले, मुली, महिला आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या हातात निळे ध्वज आणि चेहऱ्यावर क्रांतीसूर्याच्या जयंतीचा आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण मिरवणूक मार्गावर उत्साहाचे आणि शिस्तीचे वातावरण दिसून आले.. यावेळी मिरवणुकीतील अनुयायांना विविध सामाजिक संघटने कडून पाणी शरबत व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती चोक बंदोबस्तामध्ये भीम जयंती साजरी करण्यात आली
=====================
सोबत


The app version is a game changer. It is so much more convenient to play on the go. Everything works perfectly after the latest update. 1777betapploginapk
Super happy with the rewards program here. It really keeps things exciting and gives you more value for your time. phbet100com is the real deal.