उमरखेड नगर परिषद प्रभाग क्र. १ मध्ये ‘SIR मॅपिंग’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

youtube

उमरखेड नगर परिषद प्रभाग क्र. १ मध्ये ‘SIR मॅपिंग’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

उमरखेड:
उमरखेड नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या सोयीसाठी आणि तांत्रिक नोंदी अद्ययावत करण्यासाठी आज ‘SIR मॅपिंग’ विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी व जिल्हा समन्वयक श्री नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात आणि प्रभागाचे नगरसेवक इंजी. सुरेंद्र कोडगीरवार यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कॅम्पमध्ये प्रभागातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तांत्रिक नोंदींच्या अनुषंगाने SIR मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करून घेतली. नागरिकांना या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी नगरसेवक कोडगीरवार व त्यांच्या टीमने चोख नियोजन केले होते.
या प्रसंगी प्रामुख्याने कैलास शिंदे, संतोष कंठले, संदीप साळवे, दिगंबर मोरे आणि टोंगे सर बी.एल.ओ. (BLO) म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मॅपिंगचे महत्त्व पटवून दिले व प्रक्रियेत सहकार्य केले.
हनुमान वार्ड स्थित श्रीहरी सुपर मार्केट च्या आवारात दिवसभर चाललेल्या या कॅम्पमध्ये शेकडो रहिवाशांनी भेटी देऊन आपल्या समस्यांचे निराकरण केले. या कॅम्प साठी केंद्र प्रमुख राहत अन्सारी यांचे सहकार्य लाभले, प्रभागाच्या नागरिकासाठी आणि SIR मॅपिंग साठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत नगरसेवक इंजी. सुरेंद्र कोडगीरवार यांनी यावेळी व्यक्त केले.

1 thought on “उमरखेड नगर परिषद प्रभाग क्र. १ मध्ये ‘SIR मॅपिंग’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!