शेतकऱ्यांची कामधेनु असलेला वसंत पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ . अंकुश देवसरकर.

youtube

शेतकऱ्यांची कामधेनु असलेला वसंत पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार
– डॉ . अंकुश देवसरकर
उमरखेड : –
तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजला जाणारा वसंत सहकारी साखर कारखाना विक्रीस न काढता न्यायालयाने तो भाडेतत्वावर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला असतांना डेक्कन शुगर युनिटसोबत भागीदारी करून टेंडर भरले तो अनुभवी असलेल्या वाधवाणी सोबत चालविण्यास मिळाल्यास सदर कारखाना येत्या 10 वर्षात शेतकऱ्यांचा होईल . कामधेनुला पुन्हा फुलविण्याची संधी मिळावी असे प्रतिपादन नांदेड येथील भगवती हॉस्पीटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर यांनी केले आहे .
स्व . दिगंबरराव पसलवाड सेवाभावी संस्था चातारी तसेच ग्रामपंचायतच्या विद्यमाने चातारी येथे दि . 8 ऑक्टोंबर रोजी आयोजित दातृत्व आणि कर्तृत्वाचा सन्मान कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देतांना बोलत होते . यावेळी त्यांच्यासमवेत गावातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत प्राचार्य वि. ना कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तराव शिंदे, प्रा . सुधाकर लोमटे , कल्याणराव माने , शिवाजीराव माने , आर सी माने , आनंदराव राणे , आत्माराम पाटील वाटेगावकर सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवाजीराव माने , नामदेव माने , धोंडबाराव माने , सरपंच सौ रंजनाताई संतोषराव माने आदिंची विचारपिठावर उपस्थिती होती .
विदर्भ – मराठवाडा सिमेवर उमरखेड असलेल्या तालुक्याचे सर्वाधिक नाते संबंध मराठवाड्याशी जुळलेले आहे . पैनगंगा नदीवर पुल व रस्ता नसल्याने तालुक्यातील 10 ते 15 गावातील नागरिकांना केवळ रस्त्या अभावी 50 ते 60 किलोमिटरचे अंतर पार करून मराठवाड्यातील नांदेड व हदगाव शहराशी संपर्क साधावा लागतो . हे हेरून मतखंडातील देवसरीचे सुपुत्र व नांदेड येथील भगवती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पीटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे यांनी खिशात टाकलेल्या लेखी चिठीत सुचविल्या प्रमाणे स्वखर्चाने सदर रस्ता निर्माण करून नागरिकांची गैरसोय दुर केली . वसंत सहकारी साखर कारखाना मागील चार वर्षा पासून बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली फरफट लक्षात घेता आपण वाधवाणी यांच्या मालकीच्या डेक्कन शुगर सोबत भागीदारीत टेंडर टाकून सदर कारखाना चालविण्याचे अहोभाग्य आपणास लाभेल व शेतकरी समृद्ध होईल या आशेने टेंडर टाकले असल्याचे डॉ. देवसरकरांनी सांगीतले . नवे नेतृत्व निर्माण करताना जून्या नेतृत्वाचाही विसर पडता कामा नये असे यावेळी म्हटले .तसेच यापुढे गोर गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी ग्रामिण परिसरात योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ. अंकुश देवसरकर यांनी व्यक्त केला . यावेळी गावातील आरोग्य , शिक्षण , पशु वैद्यकिय ‘ विद्युत कर्मचारी , आशा वर्कर ‘ अंगणवाडी सेविका अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला . या वेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. वि ना कदम यांनी सेवाधर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचे नाव समाजात प्रथम क्रमांकावर असते आपल्या निर्व्याज, निस्वार्थ कार्यात व्यस्त असणाऱ्या व्यक्तीला नवजीवन मिळते असे मोलाचे विचार मांडले. शिवाजी माने यांनी डॉ . अंकुश देवसरकर यांच्या सारख्या सेवा कार्याची धडपड असलेल्या व्यक्तीमत्वाने लोकसभा निवडणूक लढवावी व राजकारणात सक्रिय व्हावे , अशा व्यक्तींची समाजाला गरज आहे अशी इच्छा व्यक्त केली, तर आर सी . माने यांनी गोर गरीबांच्या मुलांना शिक्षणात हातभार लागावा यासाठी सेवाभावी संस्थेकडे 10 हजार रुपयांची देणगी जाहिर केली प्रा . सुधाकर लोमटे , आत्माराम पाटील वाटेगावकर , जांबुवंतराव माने आदिंनी विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा .संतोष माने यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला . कार्यक्रमाचे संचलन चंद्रकांत पवार यांनी तर आभार सरपंच रंजनाताई माने यांनी मानले.
चातारी ग्राम पंचायत सरपंच सौ. रंजनाताई माने यांनी ग्रां . पं . च्या वतिने व स्व . दिगंबरराव पसलवाड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी सेवा कार्य करणाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “शेतकऱ्यांची कामधेनु असलेला वसंत पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ . अंकुश देवसरकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!