API पंकज कांबळे यांच्या उजाडल्या नंतर चे स्वप्न या आत्मचरित्राला साहित्यरत्न पुरस्कार जाहीर.

youtube

*API पंकज कांबळे यांच्या उजाडल्यानंतरचे स्वप्न या आत्मचरित्राला साहित्यरत्न पुरस्कार जाहीर*

लेखक API पंकज कांबळे यांनी मानले निवड समितीचे आभार.

अकोला

-:झोपेत स्वप्न तर सगळेच पाहतात पण स्वप्न त्यांचीच प्रत्यक्षात उतरतात जे रात्रीच्या गडद अंधारात नाही तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात व ते स्वप्न पूर्ण करण्यास दिवस रात्र एक करून पूर्णत्वास नेतात. स्वप्न बघण्यासाठी कोणत्याही मर्यादा नसतात बंधने नसतात पण आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करतो किती जीवतोड मेहनत घेतो हे अत्यंत महत्त्वाचे असते.
खाकी वर्दी मधील खूप मोजके लोक साहित्याचा व्यासंग जपतांना आपण बघितले असतील. त्यातीलच एक आपल्या कलागुणांमुळे नावारुपाला आलेले नाव म्हणजेच API’पंकज कांबळे’.
लेखक पंकज कांबळे यांनी आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास,संघर्षमय जीवनाची कहाणी “उजाडल्यानंतरचे स्वप्न “या आत्मचरित्र्यामधून लोकांसमोर मांडली आहे आणि हे पुस्तक अल्पावधीतच वाचकांच्या कमालीचे पसंतीचे बनले आहे. विद्यार्थी दशेतील प्रत्येक तरूणाने वाचण्या सारखे हे पुस्तक आहे.त्यांचे मुळगाव यवतमाळ जिल्हयातील पुसद तालूक्यातील लोहरा ईजारा घरी आठराविश्व दारिद्र वडील मिस्त्री तर आई वडिलांच्या हाताखाली काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.कसाबसा घरगाडा चालायचा त्यामुळे आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी स्वतः API पंकज कांबळे यांनी मजूरीचे काम करुन जिद्दीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात सन 2010 MPSC PSI पदाची परीक्षा पास केली होती. मागील11वर्षापासून ते पोलीस खात्यात हूशार आणि कर्तव्यदक्ष मेहनती अधिकारी म्हणून आपली सेवा बजावत आहेत.
एपीआय पंकज कांबळे हे उत्कृष्ठ गीतकार असून त्यांची आतापर्यंत एकूण १४ गाणी त्यांच्या superstar cop या youtube चॕनलवर रिलीज झाली आहेत जी खूप लोकप्रीय अशी गाणी आहे.आपण youtube वर पंकज कांबळे हे नाव सर्च जरी केले तरी आपणास पंकज कांबळे यांचे प्रेरणायी व्हिडीओ आणि कथा तसेच गाणी ऐकायला मिळतील.त्यांचे आगामी प्रेमगीत प्रसिद्ध बाॕलीवूड सिंगर
वैशाली माडे यांच्या आवाजात रेकाॕर्ड झालेले असून व्हिडीओ साँग मध्ये स्वतः पंकज कांबळे यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे.गीत लवकरच आपल्याला zee music co. या चॕनलवर आणि पंकज कांबळे यांच्या superstar cop या youtube चॕनलवर बघायला मिळेल.पंकज कांबळे यांचे अमरावती आकाशवाणीवर दोन कार्यक्रम प्रसारीत झालेले असून त्याची सुद्धा लिंक चॕनेलवर आहे.
पोलीस खात्यासारख्या व्यस्त ड्युटीमधून वेळातला वेळ काढून एपीआय पंकज कांबळे हे आपली कला जोपासत आहेत.त्यांचे प्रकाशीत साहित्य
1 उड्डाण- (कवितासंग्रह) पहिली आवृत्ती संपली.
2 उजाडल्यानंतरचे स्वप्न आत्मचरिञ
3.फक्त तुझ्याचसाठी (कवितासंग्रह )
4.शरीर विकणे आहे (कथासंग्रह ) प्रकाशनाच्या मार्गावर पंकज कांबळे यांचे आतापर्यंत एकूण ०३ पुस्तक प्रकाशीत असून चौथे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.पंकज कांबळे यांना सन 2021 सालचा तरुणाई फाऊंडेशन चा युवा भूषण पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता.आता नुकताच त्यांच्या उजाडल्यानंतरचे स्वप्न या पुस्तकाला सुद्धा सृष्टी बहूउद्देशीय फाऊंडेशन चा साहित्यरत्न हा सन्मानाचा पुरस्कार जाहिर झालेला आहे.या अगोदर सुद्धा API कांबळे यांना
1.राजर्षी शाहू महाराज पुरस्कार
2.विशेस सेवा पदक
3.आंतरीक सुरक्षा पदक
4.युवा भूषण पुरस्कार 2021
5.साहित्यरत्न पुरस्कार 2022 जाहिर
असे पुरस्कार मिळाले आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!