ब्राह्मणगाव ग्रामपंचायत येथे नवीन ग्रामसेवक यांची नियुक्ती करा.

youtube

ब्राह्मणगाव ग्रामपंचायत येथे नवीन ग्रामसेवक यांची नियुक्ती करा

[ अन्यथा सरपंचासह गावकरी उपोषणाला बसण्याचा इशारा ]

प्रतिनिधी उमरखेड
तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्राम विकास अधिकारी श्री एस बी पाडळकर हे निलंबित झाले असून दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथील अनेक विकासात्मक कामे रखडली आहे चालू वर्षाचा मार्च महिना असल्याने अनेक कामे थंडबसत्यात आहे. ब्राह्मणगाव येथील ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकांची अत्यंत गरज असल्याकारणाने ब्राह्मणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे व अरविंद धबडगे यांच्यासह गावकरी मंडळींनी अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक मिळण्याची मागणी गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांच्याकडे वेळोवेळी केली आहे.
तरी देखील ग्रामपंचायत ब्राह्मणगाव यांना ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक दिला नसल्यामुळे ब्राह्मणगाव ग्रामपंचायत मधील अनेक व्यवहार करण्यास सरपंच व अन्य कर्मचारी यांनी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची निवड न केल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषण चा इशाराही ब्राम्हणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे, उपसरपंच प्रियांका गोरे, अरविंद धबडगे, व अन्य ब्राम्हणगाव येथील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.

Google Ad
Google Ad

6 thoughts on “ब्राह्मणगाव ग्रामपंचायत येथे नवीन ग्रामसेवक यांची नियुक्ती करा.

  1. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!